वीरेंद्र सेहवाग, योगेश्वर दत्तकडून BSF जवानाचे समर्थन

By admin | Published: January 10, 2017 02:04 PM2017-01-10T14:04:33+5:302017-01-10T14:05:21+5:30

सीमारेषेवर वरिष्ठ अधिका-यांकडून मिळाणा-या वागणुकीची व्यथा व्हिडीओच्या माध्यमातून मांडणा-या बीएसएफ जवानाचं क्रिकेटर वीरेंद्र सेहवाग आणि कुस्तीपटू योगेश्वर दत्तने समर्थन केले आहे.

Virender Sehwag, Yogeshwar Datta's support to the BSF | वीरेंद्र सेहवाग, योगेश्वर दत्तकडून BSF जवानाचे समर्थन

वीरेंद्र सेहवाग, योगेश्वर दत्तकडून BSF जवानाचे समर्थन

Next

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 10 - बीएसएफचे जवान तेज बहादूर यादव यांच्या व्हायरल झालेल्या कथित व्हिडीओमुळे देशात खळबळ उडाली आहे. सीमारेषेवर जवानांच्या होणा-या गैरसोयीकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न या व्हिडीओच्या माध्यमातून करण्यात आला आहे.  दरम्यान, क्रिकेटर वीरेंद्र सेहवाग आणि कुस्तीपटू योगेश्वर दत्तने या जवानाचे समर्थन केले आहे. 
 
सीमारेषेवर तैनात असणा-या जवानांसाठी सरकारतर्फे येणारे धान्य अधिकारी बाजारात विकतात आणि जवानांना निकृष्ट दर्जाचे जेवण दिले जाते, असे सांगत तेज बहादूर यादव यांनी अधिका-यांवर घोटाळ्याचे आरोप या व्हिडीओतून केला आहे. 
यावर वीरेंद्र सेहवागने नाराजी व्यक्त करत जवानाचे समर्थन करणारे ट्विट केले आहे. 'आपल्या  सैनिक आणि शेतकऱ्यांची देखभाल करणे गरजेचे आहे. जवानांच्या खाण्याची योग्य व्यवस्था झाली पाहिजे.’असे ट्विट वीरेंद्रने केले आहे. 
(अधिका-यांना भ्रष्ट म्हणणारा तो जवानच बेशिस्त - BSFचा आरोप)
 
'ऊन असो वा पाऊस वा बर्फाचा तेज मारा, कोणत्याही परिस्थिती आम्ही सीमेवर 12-12 तास उभं राहून डोळ्यात तेल घालून पहारा देतो. आम्ही आमचे कर्तव्य चोखपणे बजावत असतानाच आम्हाला धड पुरेसे खायलाही मिळत नाही' अशी खंत बीएसएफचे जवान तेज बहादूर यादव यांनी व्हिडीओतून मांडताना अधिका-यांकडून कशी वाईट वागणूक मिळते, याचा पाढाही वाचला. 
(जवान शहीद होताना पर्रीकर गोव्यात तिकीट वाटपात मग्न - शिवसेना)
 
केवळ वीरेंद्र सेहवागनंच नाही तर कुस्तीपटू योगेश्वर दत्तनेही तेज बहादूर यादव यांचे समर्थन केले आहे. सोशल मीडियावरही अनेकांनी या जवानाला पाठिंबा दर्शवत त्यांचा व्हिडीओ शेअर केला आहे. दरम्यान, जवानाच्या व्हायरल व्हिडीओमुळे एकच खळबळ उडाली असून गृहमंत्रालयाने यासंबंधी अहवाल सादर करायला सांगितला आहे.
(आईला भेटण्यासाठी पंतप्रधान मोदींची योगाला दांडी)
 

Web Title: Virender Sehwag, Yogeshwar Datta's support to the BSF

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.