‘गुंगा पैलवान’ वीरेंद्र सिंग परत करणार पद्मश्री पुरस्कार; तेंडुलकर, नीरजला मदतीचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2023 06:01 IST2023-12-24T05:59:39+5:302023-12-24T06:01:22+5:30
गुंगा पैलवान म्हणून प्रसिद्ध असलेल्या वीरेंद्र सिंगनेही पद्मश्री पुरस्कार परत करण्याची घोषणा केली.

‘गुंगा पैलवान’ वीरेंद्र सिंग परत करणार पद्मश्री पुरस्कार; तेंडुलकर, नीरजला मदतीचे आवाहन
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली ( Marathi News ):कुस्ती महासंघाच्या निवडणुकीत बृजभूषण शरण सिंह यांचे निकटवर्तीय संजय सिंह यांच्या विजयानंतर साक्षी मलिकने निवृत्तीचा व बजरंग पुनियाने पद्मश्री पुरस्कार परत करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर गुंगा पैलवान म्हणून प्रसिद्ध असलेल्या वीरेंद्र सिंगनेही पद्मश्री पुरस्कार परत करण्याची घोषणा केली. तसेच सचिन तेंडुलकर व नीरज चोप्रा यांनाही मदतीचे आवाहन केले.
मूकबधिरांच्या ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक पटकावणाऱ्या वीरेंद्र सिंगने साक्षी मलिक आणि बजरंग पुनियाच्या निर्णयाचे समर्थन केले आहे. सोशल मीडियावरील पोस्टमध्ये त्याने म्हटले, मी माझी बहीण आणि देशाच्या लेकींसाठी पद्मश्री परत करण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, मला तुमच्या मुलीचा व माझी बहीण साक्षी मलिकचा अभिमान आहे; पण मी देशातील आघाडीच्या खेळाडूंनाही आवाहन करीन की, त्यांनीदेखील त्यांचा निर्णय घ्यावा.