देशात २१ विमानतळांवर व्हायरस तपासणी केंद्रे; गरज असेल तरच चीनचा प्रवास करा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2020 05:02 AM2020-01-30T05:02:58+5:302020-01-30T05:05:04+5:30

देशात या व्हायरसचे संशयित रुग्ण वाढल्यानंतर सरकारने चीनला जाणाऱ्या लोकांना अगदी गरज असेल तरच जा. प्रवास रद्द करणे शक्य असेल तर तो करा किंवा त्यात बदल तरी करा, असे आवाहन केले.

Virus detection centers at 3 airports in the country; Travel to China only if needed | देशात २१ विमानतळांवर व्हायरस तपासणी केंद्रे; गरज असेल तरच चीनचा प्रवास करा

देशात २१ विमानतळांवर व्हायरस तपासणी केंद्रे; गरज असेल तरच चीनचा प्रवास करा

Next

- संतोष ठाकूर

नवी दिल्ली : चीनमधून जगात पसरत चाललेल्या कोरोना व्हायरसला अटकाव करण्यासाठी केंद्र सरकारने मुंबई आणि गोव्यासह देशात २१ विमानतळांवर या व्हायरसच्या संशयित रुग्णांच्या स्क्रिनिंग/तपासणीसाठी केंद्र स्थापन केले आहेत. ज्या विमानतळांवर या व्हायरसच्या संशयितांची स्क्रिनिंग होऊ शकते त्यात दिल्ली, हैदराबाद, मुंबई, कोचीन, बंगळुरू, अहमदाबाद, अमृतसर, कोलकाता, कोईमतूर, गुवाहाटी, गया, बागडोगरा, जयपूर, लखनौ, चेन्नई, तिरूवतनंतपूरम, त्रिची, वाराणसी, विजाग, भुवनेश्वर आणि गोव्याचा समावेश आहे.
एक अधिकारी म्हणाला की, यातील काही विमानतळांवरून थेट चीनला विमानसेवा आहे तर काही विमानतळे अशी आहेत की चीनला जाण्याची व तेथून येण्याची सोय असलेल्या विमानतळांवर विमानसेवा आहे.
देशात या व्हायरसचे संशयित रुग्ण वाढल्यानंतर सरकारने चीनला जाणाऱ्या लोकांना अगदी गरज असेल तरच जा. प्रवास रद्द करणे शक्य असेल तर तो करा किंवा त्यात बदल तरी करा, असे आवाहन केले. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने या व्हायरसच्या संशयितांना माहिती व सूचना करण्यासाठी किंवा तपासणीसाठी हेल्पलाईन ०११-२३९७८०४६ हा क्रमांक दिला आहे. हा क्रमांक आरोग्य मंत्रालयाचा आहे. या क्रमांकावर संपर्क साधला
असता तो व्यस्त असल्याचा निरोप मिळाला.
आरोग्य अधिकाºयाने सांगितले की, लाईन्स मर्यादित असल्यामुळे फोन व्यस्त झाला असेल. आम्ही दूरसंचार मंत्रालयाला विनंती करणार आहोत की या क्रमांकावरील लाईन्सची संख्या वाढवावी. त्यामुळे २४ तास चालणाºया या हेल्पलाईनवर जास्त लोकांना सेवा दिली जाऊ शकेल.

Web Title: Virus detection centers at 3 airports in the country; Travel to China only if needed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.