CoronaVirus: विषाणू हवेत वेगाने पसरल्यामुळे रुग्ण वाढू लागले; डॉ. रणदीप गुलेरियांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2021 04:37 AM2021-04-20T04:37:22+5:302021-04-20T04:37:44+5:30

आरोग्य मंत्रालयाच्या एका वेबिनारमध्ये सोमवारी नीति आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल आणि एम्सचे संचालक व टास्क फोर्सचे सदस्य डॉ. रणदीप गुलेरिया यांनी ‘लोकमत’ कडून विचारल्या गेलेल्या प्रश्नांवर म्हटले की, विषाणूचा प्रसार हवेतून जास्त वेगाने होत आहे.

As the virus spreads rapidly through the air, patients are increasing | CoronaVirus: विषाणू हवेत वेगाने पसरल्यामुळे रुग्ण वाढू लागले; डॉ. रणदीप गुलेरियांचा इशारा

CoronaVirus: विषाणू हवेत वेगाने पसरल्यामुळे रुग्ण वाढू लागले; डॉ. रणदीप गुलेरियांचा इशारा

googlenewsNext

एस. के. गुप्ता
लोकमत न्यूज नेटवर्क 
नवी दिल्ली : कोरोनाचा विषाणू ज्या वेगात पसरतो आहे तसे फक्त हवेतूनच शक्य आहे, असे प्रतिष्ठित वैदयकीय मासिक ‘द लान्सेट’ ने अभ्यासात म्हटले आहे. त्या आधी हा दावा केला जात होता की, कोरोना विषाणू रुग्णाच्या शिंकेतून किंवा खोकल्यातून बाहेर पडणाऱ्या कणांद्वारे (ड्रॉपलेटस) पसरतो. 


आरोग्य मंत्रालयाच्या एका वेबिनारमध्ये सोमवारी नीति आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल आणि एम्सचे संचालक व टास्क फोर्सचे सदस्य डॉ. रणदीप गुलेरिया यांनी ‘लोकमत’ कडून विचारल्या गेलेल्या प्रश्नांवर म्हटले की, विषाणूचा प्रसार हवेतून जास्त वेगाने होत आहे. याचे कारण हे आहे की, यापूर्वीच्या लॉकडाऊनमध्ये लोक घरात थांबले होते व आता मात्र घरांबाहेर फिरत आहेत. लोकांनी मास्क वापरावा व सहा फुटांचे अंतर कटाक्षाने राखावे.  डाॅ. रणदीप गुलेरिया यांनी रेमडेसिविर, स्टेरॉईड आणि प्लाझा थेरपीबद्दलची स्थिती बरीच स्पष्ट केली. ते म्हणाले, जे रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत त्यांनाच रेमडेसिविर दिले गेले पाहिजे. प्राणवायूची कमी असताना छातीचा एक्सरे किंवा सीटी-स्कॅनमध्ये याला दुजोरा मिळावा की, विषाणू आत जाऊन बसला आहे. हे इंजेकशन मृत्यूचा दर कमी करणारे नाही. कारण आमच्याकडे विषाणूविरोधी औषध नाही. म्हणून आम्ही याचा वापर करू शकतो. कोरोनाची हलकी लक्षणे असताना हे इंजेक्शन घेऊ नये. कोरोनाची बाधा झाल्यावर हे इंजेक्शन लवकर देऊन काही लाभ नाही. जर डॉक्टरांच्या सल्ल्याने थोड्या अंतराने ताप उतरल्यावर दिले गेल्यास ते ठीक आहे. 


रेमडेसिविर आता फक्त रुग्णालयात मिळेल
n    रेमडेसिविर इंजेक्शन औषधांच्या दुकानात मिळते ना रुग्णालयात. मग मिळणार कोठे या प्रश्नावर पॉल म्हणाले, ‘रेमडेसिविर’ इंजेक्शनचे उत्पादन रोज १.५ लाख बाटल्या व्हायचे. भारतातून १०० देशांना निर्यात व्हायची. 
n    देशात सात औषध कंपन्या त्याचे उत्पादन करतात. त्या सगळ्यांना उत्पादन २६ लाख बाटल्यांऐवजी ४० लाख बाटल्या कराव्यात आणि त्यानंतर
महिनाभरात ७६ लाख बाटल्यांपर्यंत न्यावे, असे सांगितले आहे.’  
n    पॉल म्हणाले, ‘औषधांच्या दुकानांवरील या इंजेक्शन्सची टंचाई पाहता ते इंजेक्शन आता फक्त रुग्णालयात मिळेल, असा निर्णय घेतला गेला आहे.’

Web Title: As the virus spreads rapidly through the air, patients are increasing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.