आंध्र प्रदेशची नवी राजधानी विशाखापट्टणम असणार, मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डींची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2023 04:09 PM2023-01-31T16:09:08+5:302023-01-31T16:09:49+5:30
Vishakhapatnam to be new Andhra Pradesh capital : आता आंध्र प्रदेशची राजधानी अमरावती (Amravati) असणार नाही.
विशाखापट्टणम : दक्षिण भारतीय राज्य आंध्र प्रदेशची (Andhra Pradesh) राजधानी बदलण्यात आली आहे. आता आंध्र प्रदेशची राजधानी अमरावती (Amravati) असणार नाही. विशाखापट्टणम (Visakhapatnam) ही आंध्र प्रदेशची नवी राजधानी म्हणून ओळखली जाणार आहे. यासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी (Chief Minister Jagan Mohan Reddy) यांनी मंगळवारी मोठी घोषणा केली आहे.
वृत्तसंस्था एएनआयच्या म्हणण्यानुसार, आंध्र प्रदेशसाठी नवीन राजधानीची घोषणा नऊ वर्षांनंतर करण्यात आली आहे. तेव्हा तेलंगणा राज्याला आपल्या प्रदेशातून वेगळे केले होते आणि हैदराबादला त्याची राजधानी म्हणून देण्यात आले होते. दिल्लीतील एका कार्यक्रमात वायएसआर काँग्रेसचे प्रमुख आणि मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी म्हणाले, "मी तुम्हाला विशाखापट्टणम येथे आमंत्रित करतो, जी आगामी काळात आमची राजधानी बनणार आहे. येत्या काही महिन्यांत मी स्वतः विशाखापट्टणमला शिफ्ट होणार आहे."
Vishakhapatnam to be new Andhra Pradesh capital: CM Jagan Reddy
— ANI Digital (@ani_digital) January 31, 2023
Read @ANI Story | https://t.co/etRGDgWCCa#AndhraPradesh#Vishakhapatnam#JaganMohanReddy#AndhraPradeshCapitalpic.twitter.com/IaTnoWwZgp
याचबरोबर, मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी म्हणाले की, "आम्ही जागतिक शिखर परिषदेचे आयोजन करत आहोत. हे 3 आणि 4 मार्च रोजी विशाखापट्टणम येथे होणार आहे. मी तुम्हा सर्वांना या शिखर परिषदेसाठी वैयक्तिकरित्या आमंत्रित करत आहे. तुम्हा सर्वांना विनंती आहे की, तुम्ही फक्त इथेच न येता तुमच्या परदेशातील सहकाऱ्यांसमोर याविषयी चांगले मत मांडा."
दरम्यान, दिल्लीत आंतरराष्ट्रीय राजनैतिक आघाडीच्या बैठकीत मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी बोलत होते. मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी विदेशी आणि देशांतर्गत गुंतवणूकदारांनी येथे येऊन आंध्र प्रदेश राज्यात व्यवसाय करणे किती सोपे आहे, ते पाहावे, असे आवाहन केले आहे.