विहिंपचे माजी अध्यक्ष विष्णू हरि डालमिया यांचे निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2019 01:43 PM2019-01-16T13:43:12+5:302019-01-16T14:28:25+5:30
विश्व हिंदू परिषद (VHP) चे माजी अध्यक्ष विष्णू हरी डालमिया यांचे बुधवारी निधन झाले आहे. वयाच्या 91 व्या वर्षी डालमिया यांनी अखेरचा श्वास घेतला.
नवी दिल्ली - विश्व हिंदू परिषद (VHP) चे माजी अध्यक्ष विष्णू हरी डालमिया यांचे बुधवारी निधन झाले आहे. वयाच्या 91 व्या वर्षी डालमिया यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून डालमिया आजारी होते. विश्व हिंदू परिषदचे वरिष्ठ नेते अशोक सिंहल आणि गिरिराज किशोर यांच्यासहीत डालमिया यांनी राम जन्मभूमी आंदोलनामध्ये महत्त्वाची भूमिका निभावली आहे.
डालमिया यांचे पार्थिव दुपारी 3 वाजेपर्यंत नवी दिल्लीतील निवासस्थानी ठेवण्यात येणार आहे.
यानंतर 4:30 वाजता निगमबोध घाटावर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. 1979 पासून डालमिया विश्व हिंदू परिषदेसोबत जोडले गेले आहेत. उपाध्यक्ष आणि कार्याध्यक्ष पदांनंतर, 2005पर्यंत त्यांनी विहिंपचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष पदाची जबाबदारीही सांभाळली आहे.
विष्णू हरि डालमिया यांना 22 डिसेंबर 2018रोजी अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले होते. यानंतर डालमिया यांच्या इच्छेनुसार 14 जानेवारीला त्यांना निवासस्थानी आणण्यात आले. त्यांच्या निवासस्थानीच औषधोपचार सुरू होते. पण बुधवारी (16 जानेवारी) 9.38 वाजता त्यांचे निधन झाले.