सँटाक्लॉजने मुलांना चॉकलेट वाटण्यावर विश्व हिंदू परिषदेचा आक्षेप
By admin | Published: November 26, 2014 05:49 PM2014-11-26T17:49:02+5:302014-11-26T17:49:02+5:30
नाताळसणानिमित्त सँटाक्लॉजने मुलांना चॉकलेट वाटणे ही मुलांसाठी आनंदाची घटना आहे. परंतू, या घटनेला विश्व हिंदू परिषदेने आक्षेप घेतला आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
बस्तर(छत्तीसगड), दि. २६ - नाताळसणानिमित्त सँटाक्लॉजने मुलांना चॉकलेट वाटणे ही मुलांसाठी आनंदाची घटना आहे. परंतू, या घटनेला विश्व हिंदू परिषदेने आक्षेप घेतला आहे. चर्चवरती नियंत्रण असावे तसेच शआळेत व शाळेच्या बसमध्ये धार्मिक कृत्ये केली जाऊ नयेत म्हणून सँटाक्लॉजच्या चॉकलेट वाटण्यावर बंदी आणत असल्याचे विश्व हिंदू परिषदेने सांगितले आहे. यापूर्वीही विश्व हिंदू परिषदेने येथील कॉन्व्हेंट शाळांमध्ये 'फादर'चा उल्लेख प्राचार्य किंवा सर असा करण्यासाठी दबाव आणला होता. याबाबत दोन्ही संघटनांनी बैठक घेतली होती. तसेच येथील कॉन्व्हेंट शाळांच्या प्रवक्त्यांनी फादर या शब्दाबद्दल विशअव हिंदू परिषदेची मागणी मान्य केली होती. त्याचप्रमाणे कॉन्व्हेंट शाळांमध्ये सरस्वतीदेवीसह इतर महापुरुषांचे फोटो लावावेत अशीही अट व्हिएचपीने घातली होती. परंतू काही अटींबाबत आमच्या धार्मिक स्वातंत्र्यावर गदा येत असल्याचे कॅथलीक पंथाच्या प्रवक्त्यांनी म्हटलं आहे.