के. विश्वनाथ यांना दादासाहेब फाळके पुरस्कार घोषित

By admin | Published: April 24, 2017 10:25 PM2017-04-24T22:25:20+5:302017-04-24T22:25:20+5:30

येत्या 3 मे रोजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. सुवर्ण कमळ, 10 लाख रुपये रोख आणि शाल असे या पुरस्काराचे स्वरूप आहे

Of Vishwanath has been declared the Dadasaheb Phalke Award | के. विश्वनाथ यांना दादासाहेब फाळके पुरस्कार घोषित

के. विश्वनाथ यांना दादासाहेब फाळके पुरस्कार घोषित

Next

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 24 - साऊण्ड डिझायनर ते दिग्दर्शक असा प्रवास करणारे के. विश्वनाथ यांना यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे. चित्रपट क्षेत्रातील भरीव योगदानासाठी हा पुरस्कार दिला जातो. येत्या 3 मे रोजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. सुवर्ण कमळ, 10 लाख रुपये रोख आणि शाल असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. दादासाहेब फाळके पुरस्कार समितीने या पुरस्कारासाठी "कलातपस्वी" के. विश्वनाथ यांची शिफारस केली होती. या शिफारशीवर व्यंकय्या नायडू यांनी शिक्कामोर्तब केले. नायडू यांनी ट्विटरच्या माध्यमातून या पुरस्काराची घोषणा केली. के. विश्वनाथ यांचे तेलगू, तामिळ आणि हिंदी अशा तिन्ही भाषांमध्ये मोठं योगदान आहे. यापूर्वी त्यांना पद्मश्री पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आलेले आहे.
काही राष्ट्रीय पुरस्कारांसह अनेक फिल्मफेअर पुरस्कार, नांदी पुरस्कारांनीही त्यांचा गौरव झालाय. अभिनेता, लेखक, दिग्दर्शक, साऊण्ड डिझायनर अशा अनेक भूमिकांमधून त्यांनी सिनेसृष्टीसाठी सातहून अधिक दशकं त्यांनी काम केलंय.
के. विश्वनाथ यांनी दिग्दर्शित केलेला "स्वाती मुथ्यम" या सिनेमाला 59व्या ऑस्कर पुरस्कारांसाठी भारताकडून ऑफिशियल एण्ट्री म्हणून पाठवण्यात आलं होतं. सरगम, कामचोर, संजोग , जाग उठा इन्सान , ईश्वर , संगीत, धनवान या गाजलेल्या हिंदी चित्रपटांचे दिग्दर्शन के विश्वनाथ यांनी केलं आहे.

Web Title: Of Vishwanath has been declared the Dadasaheb Phalke Award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.