शपथ घेण्यापूर्वी आज दिल्लीला जाणार कुमारस्वामी, राहुल आणि सोनिया गांधींची भेट घेणार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2018 09:10 AM2018-05-21T09:10:54+5:302018-05-21T09:11:36+5:30

कर्नाटकात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेलं राजकीय नाट्य आता जवळपास संपल्यात जमा आहे. भाजपाच्या येडियुरप्पांचं सरकार कोसळल्यानंतर आता काँग्रेस आणि जेडीएस नवं सरकार स्थापण्याच्या तयारीत आहेत.

the visit to Delhi will be meet sonia and rahul gandhi, Before taking a Swear by Mr. Kumaraswamy, | शपथ घेण्यापूर्वी आज दिल्लीला जाणार कुमारस्वामी, राहुल आणि सोनिया गांधींची भेट घेणार

शपथ घेण्यापूर्वी आज दिल्लीला जाणार कुमारस्वामी, राहुल आणि सोनिया गांधींची भेट घेणार

Next

नवी दिल्ली- कर्नाटकात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेलं राजकीय नाट्य आता जवळपास संपल्यात जमा आहे. भाजपाच्या येडियुरप्पांचं सरकार कोसळल्यानंतर आता काँग्रेस आणि जेडीएस नवं सरकार स्थापण्याच्या तयारीत आहेत. मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यापूर्वी एचडी कुमारस्वामी आज नवी दिल्लीत जाणार आहेत. नवी दिल्लीत कुमारस्वारी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत.

दिल्लीत जाण्यापूर्वी कुमारस्वामी म्हणाले, सोनिया गांधी आणि राहुल गांधींची भेट घेणार असून, सरकारच्या पाच वर्षांच्या कार्यकाळासाठी आशीर्वादही घेणार आहे. तसेच या बैठकीत मंत्रिमंडळासंदर्भातही चर्चा होणार आहे. कोणाला कोणतं मंत्रिमंडळ मिळणार हे अद्याप निश्चित झालेलं नाही. तर कुमारस्वामी बुधवारी (23 मे) रोजी कर्नाटकाच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. दिल्लीला जाण्यापूर्वी कुमारस्वामी बंगळुरूतल्या अनेक मंदिरांना भेट देणार आहेत. कुमारस्वामी आज दिल्लीला जाण्यापूर्वी लक्ष्मी नरसिम्हा मंदिर, हरदनहली शिव मंदिर, रंगनाथ मंदिर, यलिमलका मंदिरात जाऊन आशीर्वाद घेणार आहेत. त्यानंतर ते दिल्लीला रवाना होणार आहेत. कर्नाटकात एच. डी. कुमारस्वामी यांच्या नेतृत्वाखालील नव्या सरकारच्या सत्तावाटपाचा फॉर्म्युला जवळपास तयार झाला असून, त्यानुसार जनता दल (धर्मनिरपेक्ष)चे 13 मंत्री व काँग्रेसचे 20 मंत्री बुधवारी शपथ घेतील, हे निश्चित झाले आहे.

शपथविधीनंतर आपण 24 तासांतच बहुमत सिद्ध करू, असा दावा कुमारस्वामी यांनी केला आहे. राज्यपाल वजुभाई वाला यांनी 15 दिवसांचा अवधी दिला आहे. कुमारस्वामी यांच्याबरोबर काँग्रेस नेतेही आज दिल्लीत जाणार आहेत. कर्नाटक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जी. परमेश्वरा म्हणाले, माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, डी. के. शिवकुमारबरोबर सोमवारी दिल्लीत जाऊन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि सोनिया गांधींची भेट घेणार आहेत. कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष जी. परमेश्वर यांना उपमुख्यमंत्रीपद मिळणे नक्की आहे. तसेच काँग्रेस फोडण्याची येडियुरप्पांची खेळी उधळून लावणारे डी. के. शिवकुमार यांचेही मंत्रिमंडळातील स्थान नक्की आहे. कुमारस्वामींच्या पक्षाकडे वित्त खाते, तर काँग्रेसकडे गृह खाते राहील, असे सध्याचे चित्र आहे. हीच दोन अतिशय महत्त्वाची खाती मानली जातात. काँग्रेसकडून अधिकाधिक लिंगायत आमदारांना मंत्रिमंडळात स्थान मिळेल, असा अंदाज असून, येडियुरप्पा यांचे भविष्यातील डाव यशस्वी होऊ नयेत, यासाठीच हे केले जाईल.बसपा, एक अपक्ष व एक मुस्लीम आमदारही सरकारमध्ये असेल.
शपथविधीदरम्यान विरोधक करणार शक्तिप्रदर्शन
कुमारस्वामी सरकारच्या शपथविधी सोहळ्यात विरोधक जोरदार शक्तिप्रदर्शन करणार आहेत. राहुल गांधी, सोनिया गांधीबरोबरत तेलंगणा राष्ट्र समितीचे प्रमुख के. चंद्रशेखर राव, बीएसपी प्रमुख मायावती, सपा नेते अखिलेश यादव, एनसीपी प्रमुख शरद पवार, तृणमूल काँग्रेस नेते ममता बॅनर्जी, तेजस्वी यादव, डीएमके नेते कनिमोळीबरोबरच दिग्गज नेते शपथग्रहण सोहळ्यात सामील होण्याची शक्यता आहे. 
सरकार चालवणे, ही आमची जबाबदारी
काँग्रेसच काही काळाने हे सरकार पाडेल, असे भाजपा नेते सांगत आहेत. पण सरकारने आपला काळ पूर्ण करावा, असे आमचे प्रयत्न राहतील, असे सांगून काँग्रेस नेता म्हणाला की, सध्या भाजपाविरोधात सर्व विरोधी पक्षांना एकत्र आणण्यासाठी राहुल गांधी प्रयत्नशील आहेत. पुढील वर्षी लोकसभेच्या निवडणुकाही आहेत. यामुळे सरकार पाडण्याचे प्रयत्न वा सरकार पडेल, अशी कृती काँग्रेसकडून होणार नाही.
अडीच वर्षांचा फॉर्म्युला नाहीच : कुमारस्वामी
मुख्यमंत्रीपद अडीच वर्षे कुमारस्वामी यांच्याकडे राहील आणि नंतर ते काँग्रेसकडे जाईल, अशा बातम्या शनिवारपासून पसरल्या होत्या. पण तसे घडणार नाही आणि आपणच पूर्ण काळ मुख्यमंत्री राहू, असे कुमारस्वामी यांनी व काँग्रेस नेत्यांनी स्पष्ट केले.

Web Title: the visit to Delhi will be meet sonia and rahul gandhi, Before taking a Swear by Mr. Kumaraswamy,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.