मसुरी येथील आयएएस प्रशिक्षण केंद्र संचालकांची जि.प.ला भेट
By Admin | Published: January 26, 2017 02:07 AM2017-01-26T02:07:58+5:302017-01-26T02:07:58+5:30
जळगाव : मसुरी येथील लाल बहादूरशास्त्री भारतीय प्रशासकीय व पोलीस सेवा अधिकारी (आयएएस, आयपीएस) प्रशिक्षण केंद्राचे संचालक तेजवीरसिंह व जसप्रीतसिंह तलवार यांनी मंगळवारी सायंकाळी जि.प.ला भेट देऊन कामकाजाची माहिती घेतली. जवळपास दीड तास या दोन्ही अधिकार्यांनी जि.प.मध्ये ग्रा.पं. , सामान्य प्रशासन विभागात जाऊन कामकाजाची माहिती घेतली.
ज गाव : मसुरी येथील लाल बहादूरशास्त्री भारतीय प्रशासकीय व पोलीस सेवा अधिकारी (आयएएस, आयपीएस) प्रशिक्षण केंद्राचे संचालक तेजवीरसिंह व जसप्रीतसिंह तलवार यांनी मंगळवारी सायंकाळी जि.प.ला भेट देऊन कामकाजाची माहिती घेतली. जवळपास दीड तास या दोन्ही अधिकार्यांनी जि.प.मध्ये ग्रा.पं. , सामान्य प्रशासन विभागात जाऊन कामकाजाची माहिती घेतली. त्यांच्यासोबत सीईओ आस्तिककुमार पांडेय, प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी सचिन ओंबासे, जलज शर्मा, जि.प.चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नंदकुमार वाणी, राजन पाटील, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक विक्रांत बगाडे, सहायक संचालक डॉ.पी.सी.शिरसाठ आदी होते. अधिकार्यांनी आपल्या विभागाची सविस्तर माहिती पीपीटीद्वारे सादर केली. छत्रपती शाहू महाराज सभागृहात याबाबत बैठक झाली. त्यानंतर विविध विभागांची पाहणी केली. जुन्या इमारतीमध्येही सिंह यांनी भेट दिली.