हरमल प्राप्ती फेडरेशनची आश्रमाला भेट

By admin | Published: March 11, 2016 10:26 PM2016-03-11T22:26:18+5:302016-03-11T22:26:18+5:30

Visit to Harmal Receiving Federation's ashram | हरमल प्राप्ती फेडरेशनची आश्रमाला भेट

हरमल प्राप्ती फेडरेशनची आश्रमाला भेट

Next
>हरमल प्राप्ती महिला फेडरेशनची महिलाश्रमाला भेट
मांद्रे : महिला दिनाचे औचित्य साधून हरमल येथील प्राप्ती महिला फेडरेशनच्या शिष्टमंडळाने शिवोली येथील सेंट मेरी होम फॉर एज या महिला वृद्धाश्रमाला भेट दिली.
फेडरेशनचे अध्यक्ष नारायण रेडकर यांच्या अध्यक्षतेखाली फेडरेशनच्या सदस्यांनी शनिवार दि. ५ रोजी महिला वृद्धाश्रमाला भेट देऊन त्यांची आस्थेने विचारपूस केली व त्यांना अन्नपदार्थ पुरविण्यात आले. यावेळी फेडरेशनच्या शिष्टमंळात फेडरेशनच्या उपाध्यक्षा स्नेहा कान्होजी, निमंत्रक सिस्टर आवेलिना, सहसचिव नविता ठाकूर उपस्थित होत्या. यावेळी फेडरेशनचे अध्यक्ष नारायण रेडकर व सिस्टर आवेलिना यांनी वृद्धाश्रमातील वृद्ध महिलांकडे हिजगूज साधले. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या व त्यांच्या वृद्धापकाळासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. एकूण २१ वृद्ध महिला या सेंट मेरी होम फॉर एज आश्रमात आपला वृद्धापकाळ घालवत आहेत. यावेळी प्रत्येक वृद्ध महिला आपल्या दैनंदिन कामात व्यस्त दिसल्या. काही वृद्ध तांदुळ निवडत होत्या. काही वाचनात मग्न होत्या. तर काही जणी लिहिताना व गप्पा गोष्टीत दंग होत्या. (प्रतिनिधी)
फोटो : हरमल प्राप्ती महिला फेडरेशनच्या शिष्टमंडळाने शिवोली येथील सेंट मेरी होम फॉर एज या महिला वृद्धाश्रमाला भेट दिल्यानंतर त्यांना अन्नपदार्थ वितरीत करताना नारायण रेडकर, सिस्टर आवेलिना, स्नेहा कान्होजी व नमिता ठाकूर. (लक्ष्मण ओटवणेकर) ०५०३-एमएपी-०९

Web Title: Visit to Harmal Receiving Federation's ashram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.