सरसंघचालक मोहन भागवत घेणार लिओनार्डो दिकॅप्रिओची भेट

By admin | Published: June 23, 2016 04:06 PM2016-06-23T16:06:44+5:302016-06-23T17:35:02+5:30

आंतरराष्ट्रीय पातळीवर सरसंघचालक मोहन भागवत संघाच्या विचारसरणीचा प्रचार करण्यासाठी अमेरिकेचा दौरा करणार आहेत.

A visit by Leonardo DiCaprio to Sarasanghchalak Mohan Bhagwat | सरसंघचालक मोहन भागवत घेणार लिओनार्डो दिकॅप्रिओची भेट

सरसंघचालक मोहन भागवत घेणार लिओनार्डो दिकॅप्रिओची भेट

Next
>
ऑनलाइन लोकमत
 
नवी दिल्ली, दि. 23 - देशभरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा बोलबाला असताना आता आंतरराष्ट्रीय पातळीवर सरसंघचालक मोहन भागवत संघाच्या विचारसरणीचा प्रचार करण्यासाठी इंग्लंडचा दौरा करणार आहेत. ऑस्कर विजेते लिओनार्डो दिकॅप्रिओ आणि इंग्लंड उद्योगपती रिचर्ड ब्रँनसन यांनी मोहन भागवतांना भेटीसाठी विशेष निमंत्रण दिलं आहे. जुलै महिन्यात मोहन भागवत इंग्लंडचा दोन दिवसांचा दौरा करणार आहेत, असं वृत्त 'डेली ओ'नं दिलं आहे.
विशेष म्हणजे दोघेही शाकाहारी असून, भागवतांच्या भेटीदरम्यान संघानं गोवंश हत्या बंदीसाठी घेतलेल्या पुढाकाराचं समर्थन करणार आहेत. दिकॅप्रिओ इंग्लंडमध्ये प्राण्यांची कत्तल रोखण्यासाठी आधीपासूनच एका संघटनेच्या माध्यमातून प्रचार करत आहेत. ब्रँनसन यांनी तर प्राण्यांपासून उड्डाण घेणारे वेगन एअरलाइन्सही तयार करणार असल्याची घोषणा केली आहे.
भागवत इंग्लंड भेटीदरम्यान हिंदू स्वयंसेवक संघ एचएसएसच्या कार्यक्रमालाही उपस्थिती दर्शवणार आहेत. यावेळी सरसंघचालक देशभरातल्या हिंदू स्थलांतरितांना मार्गदर्शनही करणार आहेत. मोहन भागवत हिंदू स्वयंसेवक संघाच्या 30 आणि 31 जुलैला होणा-या कार्यक्रमालाही भेट देणार आहेत. 

Web Title: A visit by Leonardo DiCaprio to Sarasanghchalak Mohan Bhagwat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.