आनंदाचा सोहळा! फाळणीच्या वेळी दुरावलेल्या बहीण-भावाची ७५ वर्षांनी भेट
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2022 08:07 AM2022-05-21T08:07:43+5:302022-05-21T08:08:31+5:30
भारतात येण्यासाठी पाकमध्ये व्हिसासाठी अर्जही केला आहे.
बलवंत तक्षक, लोकमत न्यूज नेटवर्क
चंडीगड : भारत-पाकिस्तान फाळणीच्या वेळी दुरावलेले बहीण-भाऊ तब्बल ७५ वर्षांनी करतारपूर साहिबमध्ये भेटले. पंजाबमधील पटियाला जिल्ह्यातील शुतराणा गावातील गुरमीत सिंह यांची बहीण गज्जो हिच्याशी भेट झाली तेव्हा या भावनोत्कटप्रसंगी त्यांच्या डोळ्यांतून अश्रू थांबत नव्हते.
गज्जो यांचे आता पाकिस्तानमध्ये मुमताज बेगम नाव आहे. फाळणीनंतर पाकमध्ये त्यांचा सांभाळ करणाऱ्या मुस्लीम कुटुंबाने त्यांना हे नाव दिले. त्या पाकमध्ये कुटुंबाची आठवण काढत जीवन कंठत होत्या. आता त्या भावाकडे पटियालामध्ये येण्यास इच्छुक आहेत. भारतात येण्यासाठी पाकमध्ये व्हिसासाठी अर्जही केला आहे.