सचिन तेंडुलकरची दत्तक घेतलेल्या गावाला भेट
By admin | Published: November 16, 2016 06:55 PM2016-11-16T18:55:12+5:302016-11-16T19:02:27+5:30
माजी क्रिकेटर आणि राज्यसभा खासदार सचिन तेंडुलकरने दत्तक घेतलेल्या आंध्र प्रदेशाच्या नेल्लोर जिल्ह्यातील पुत्तमराजूकन्ड्रिगा गावाला बुधवारी भेट दिली.
Next
ऑनलाइन लोकमत
विजयवाडा, दि. 16 - माजी क्रिकेटर आणि राज्यसभा खासदार सचिन तेंडुलकरने दत्तक घेतलेल्या आंध्र प्रदेशाच्या नेल्लोर जिल्ह्यातील पुत्तमराजूकन्ड्रिगा गावाला बुधवारी भेट दिली. स्वच्छ आणि आरोग्यदायी भारत बनविल्यामुळे मुले निरोगी होतील आणि अनेक खेळ खेळू शकतील, असा संदेश यावेळी त्याने गावक-यांना दिला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानामार्फत आपण सर्वांनी स्वच्छ भारत करण्यास सुरुवात केली पाहिजे. हे अत्यंत महत्वाचे आहे. तसेच, मला वाटते की, स्वच्छ भारतसोबत स्वस्थ भारत सुद्धा महत्वाचे आहे, असे आंध्र प्रदेशाच्या नेल्लोर जिल्ह्यातील पुत्तमराजूकन्ड्रिगा गावातील लोकांना सचिनने सांगितले. तसेच, यावेळी त्याने मुलांना क्रिकेटच्या बॅट्स, फुटबॉल्स आणि इतर खेळांचे साहित्य वाटप केले.
'सांसद आदर्श ग्राम योजनेअंतर्गत' सचिनने 110 कुटुंबाचं पुत्तमराजूकन्ड्रिगा हे गाव दोनवर्षांपूर्वी दत्तक घेतलं आहे. तसेच, ‘खासदार स्थानिक क्षेत्र विकास योजने’तून या गावाच्या विकासासाठी तीन कोटी रुपये निर्धारित केले आहेत. त्याने या गावाला दुस-यांदा भेट दिली असून यावेळी गावच्या विकासाबाबत चर्चा केली आणि गावातील शाऴेत जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
The many faces of a brighter, beautiful tomorrow. #NavaneetaPublicSchool#Nellorepic.twitter.com/cSuquKxnNy
— sachin tendulkar (@sachin_rt) 16 November 2016
The many faces of a brighter, beautiful tomorrow. #NavaneetaPublicSchool#Nellorepic.twitter.com/cSuquKxnNy
— sachin tendulkar (@sachin_rt) 16 November 2016