India China Faceoff : कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी तयार, लष्कर प्रमुख नरवणेंचा चीनला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2020 11:59 AM2020-09-04T11:59:05+5:302020-09-04T13:24:37+5:30

चीनच्या सीमेवर तैनात असलेल्या भारतीय जवानांचा विश्वास दुणावलेला असून, कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी ते पूर्णपणे तयार आहेत.

visiting different places in leh and ladakh army chief says india is ready to deal with any situation at lac | India China Faceoff : कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी तयार, लष्कर प्रमुख नरवणेंचा चीनला इशारा

India China Faceoff : कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी तयार, लष्कर प्रमुख नरवणेंचा चीनला इशारा

Next

वास्तविक नियंत्रण रेषे(LAC)वर भारताचा चीनशी तणाव वाढत आहे. त्याचदरम्यान भारताचे लष्कर प्रमुख जनरल एम. एम. नरवणे म्हणाले की, भारताने आपली सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी सीमेवर पर्याप्त सैन्य तैनात केलं आहे. लेह-लडाखला भेट देणारे जनरल नरवणे यांनी वृत्तसंस्था एएनआयशी बातचीत केली आहे.  ते म्हणाले, चीनच्या सीमेवर तैनात असलेल्या भारतीय जवानांचा विश्वास दुणावलेला असून, कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी ते पूर्णपणे तयार आहेत.

भारत सर्व परिस्थितीला तोंड देण्यास सक्षम
लष्कर प्रमुख म्हणतात, 'मी लेहला पोहोचलो आणि बर्‍याच ठिकाणी भेट दिली. मी अधिकारी व जेसीओशी बोललो व तयारीचा आढावा घेतला. जवानांचा आत्मविश्वास वाढलेला आहे आणि ते सर्व प्रकारच्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी तयार आहेत. ते म्हणाले, 'एलएसीची परिस्थिती थोडीशी तणावपूर्ण आहे. या परिस्थितीचा विचार करता आम्ही आमच्या सुरक्षिततेसाठी खबरदारी म्हणून जवान तैनात केले आहेत, जेणेकरून आपल्या सुरक्षिततेवर आणि अखंडतेवर परिणाम होणार नाही.



जगातील सर्वात हुशार सैन्य: लष्कर प्रमुख
नरवणे यांनी पुन्हा यावर जोर दिला की, एलएसीवर तैनात केलेल्या लष्कराच्या जवानांचे मनोबल खूपच उंचावलेले आहे. ते म्हणाले, 'ते खूप प्रेरित झाले आहेत. त्यांचे मनोबल उंचावले आहे आणि ते समोर उद्भवणार्‍या सर्व प्रकारच्या परिस्थितींचा सामना करण्यास तयार आहेत. आमचे अधिकारी आणि जवान हे जगातील सर्वात हुशार आहेत आणि त्याचा सैन्यच नव्हे तर देशाला अभिमान आहे. लष्कर प्रमुख गुरुवारी चुशुल सेक्टर येथे पोहोचले आणि तेथील संरक्षण तयारीचा आढावा घेतला आणि ते आज दिल्लीत परत येणार आहेत.

एलएसीवर दोन्ही देश आमनेसामने आहेत
पूर्व लडाखमधील चुशुल सेक्टरमध्ये चीननं मोठ्या प्रमाणात सैन्य तैनाती केली आहे. चिनी सैन्याच्या कोणत्याही धाडसी प्रयत्नांना चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारताने आपल्या मोर्चावर बरेच सैन्य लावले आहे. या भागात दोन्ही देशांनी सैन्य, टाक्या, शस्त्रे वाहने आणि हॉविझर्स तोफा मोठ्या संख्येने तैनात केल्या आहेत.

एअर चीफ यांनीही घेतला तयारीचा आढावा 
तणावाच्या दरम्यान भारतीय हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल आर. के. एस. भदौरिया यांनी हशिमारा (Hashimara)सह लडाख ते अरुणाचल प्रदेशपर्यंत 3,488 किमी लांबीच्या वास्तविक नियंत्रण रेषेवरच्या लष्करी विमानतळांची पाहणी केली.

चर्चेचा दरवाजा अद्यापही खुला
LACवरील अत्यंत कठोर परिस्थितीशी दोन्ही देशांनी लष्करी संभाषणाचा मार्ग खुला केला आहे. ब्रिगेडियर स्तरावरील चर्चेची चौथी फेरी गुरुवारी चुशुल-मोल्डो सीमास्थळावर झाली. यावेळी देखील संभाषणातून कोणताही तोडगा निघालेला नाही. 

Web Title: visiting different places in leh and ladakh army chief says india is ready to deal with any situation at lac

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.