फळविक्रेत्यांनी घेतली महापौरांची भेट

By Admin | Published: April 1, 2016 10:53 PM2016-04-01T22:53:55+5:302016-04-01T22:53:55+5:30

जळगाव : घाणेकर चौक ते राजकमल टॉकीज दरम्यानच्या ३२२ हॉकर्सच्या यादीत केवळ १० फळविक्रेत्यांचा समावेश असल्याचे समजल्याने बागवान समाजाच्या फळविक्रेत्यांनी शुक्रवारी सकाळी महापौर ल‹ा यांची त्यांच्या दालनात भेट घेऊन चर्चा केली. तसेच बालगंधर्व खुले नाट्यगृहालगतच्या रस्त्यावर जागा देण्याची मागणी केली.

The visitor took a visit from the mayor | फळविक्रेत्यांनी घेतली महापौरांची भेट

फळविक्रेत्यांनी घेतली महापौरांची भेट

googlenewsNext
गाव : घाणेकर चौक ते राजकमल टॉकीज दरम्यानच्या ३२२ हॉकर्सच्या यादीत केवळ १० फळविक्रेत्यांचा समावेश असल्याचे समजल्याने बागवान समाजाच्या फळविक्रेत्यांनी शुक्रवारी सकाळी महापौर ल‹ा यांची त्यांच्या दालनात भेट घेऊन चर्चा केली. तसेच बालगंधर्व खुले नाट्यगृहालगतच्या रस्त्यावर जागा देण्याची मागणी केली.
मनपाच्या दप्तरी केवळ २१८ च्या आसपास हॉकर्सची नोंद असताना सुभाष चौक रस्त्यावर ३३२ हॉकर्स असल्याचा दावा फेरीवाला सेनेतर्फे करण्यात आला होता. दरम्यान या २१८ हॉकर्समध्ये जेमतेम १० फळविक्रेत्यांचा समावेश असल्याचे निदर्शनास आल्याने बागवान समाजाच्या फळविक्रेत्यांनी महापौरांची भेट घेऊन चर्चा केली. आयुक्त संजय कापडणीस यांच्याशीही काही वेळ चर्चा केली. मात्र सुभाष चौक रस्त्यावर फळविक्रेते १० असल्याचे स्पष्ट झाले. उर्वरित फळविक्रेते हे भिलपुरा पोलीस चौकी ते टॉवर रस्त्यावरील असल्याचे स्पष्ट झाले. त्यावर या रस्त्यांवर आताच कारवाई होत नसल्याने त्यांचे स्थलांतर नंतर करण्यात येईल, असे आयुक्तांनी स्पष्ट केले.
महापौरांच्या दालनात चर्चेप्रसंगी उपमहापौर ललित कोल्हे, नगरसेवक अनंत जोशी उपस्थित होते.

Web Title: The visitor took a visit from the mayor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.