भितरकनिकात दुर्मीळ पाहुण्या पक्ष्यांचे दर्शन

By admin | Published: January 18, 2017 05:21 AM2017-01-18T05:21:45+5:302017-01-18T05:21:45+5:30

केंद्रपाडा जिल्ह्यातील भितरकनिका राष्ट्रीय अभयारण्यातील पाणथळ ठिकाणी येणाऱ्या पक्ष्यांच्या संख्येत घट झाली

Visitor's visit to rare visitors in Bhitarkanika | भितरकनिकात दुर्मीळ पाहुण्या पक्ष्यांचे दर्शन

भितरकनिकात दुर्मीळ पाहुण्या पक्ष्यांचे दर्शन

Next


केंद्रपाडा (ओडिशा) : केंद्रपाडा जिल्ह्यातील भितरकनिका राष्ट्रीय अभयारण्यातील पाणथळ ठिकाणी येणाऱ्या पक्ष्यांच्या संख्येत घट झाली असली, तरी यंदा काही दुर्मीळ पक्ष्यांचे दर्शन झाले. अभयारण्यातील पाणथळ ठिकाणी मूळच्या मध्य आशियातील दुर्मीळ प्रजाती दिसून आल्या. या वर्षी पाहुण्या पक्ष्यांच्या संख्येत किंचित घट झाली असली, तरी अभयारण्यातील पाणथळ जागा मध्य आशिया आणि हिमालयातील पाहुण्या पक्ष्यांच्या हिवाळी वास्तव्यासाठी पुन्हा अनुकूल ठरल्या आहेत.
पक्षीगणकांना ग्रेटर क्रेस्टेड टर्न, कॉमन शेल डक आणि ब्ल्यू टेल्ड गॉडविटस् यांचे थवे दिसून आले. हे सर्व पक्षी दुर्मिळ आणि धोक्यातील प्रजातींच्या श्रेणीत मोडतात. या पक्ष्यांची संख्या शंभरहून कमी असली तरी ते पहिल्यांदाच भितरकनिकात आढळले आहेत. ब्राह्मीन डक, बार-हेडेड गुज, गॉडविन, पेनटेल, पेन्टेड स्टोर्क, सीगल्स, कॉमनटिल, टोनी ईगल आणि आॅस्प्रे आदी पक्ष्यांनी हिवाळी वास्तव्यासाठी भितरकनिकाची निवड केली आहे. हे पक्षी सतभाया, रायपटिया, अगारनासी, भितरकनिका, हुकितोला, गुप्ती राजगादा, बातिघर, जटाधर आणि कालिभांजादिहा आदी पाणथळ जागांवर आढळून आले. इंडियन स्किर्म्स, ग्रे पेलिकन्स आणि व्हाईट-बॅक्ड व्हल्चर, लेसर अडजुटंट, ग्रेटर स्पॉटेज ईगल्स आदी पक्षीही भितरकनिकात पाहुणचार घेत आहेत.
>76268 पक्ष्यांनी या वर्षी भितरकनिकाला भेट दिल्याचे पक्षीगणनेत आढळून आले.
>16153 एवढ्या पक्ष्यांनी या ठिकाणी गेल्या वर्षी होती. पक्ष्यांच्या संख्येत घट झाली आहे. पाहुण्यांची संख्या घटण्यामागील कारणांचा पक्षीतज्ज्ञ शोध घेत आहेत, असे विभागीय वन अधिकारी बिमल प्रसन्ना आचार्य यांनी सांगितले. २०१६ च्या तुलनेत स्थलांतरित पक्ष्यांची संख्या ३० टक्क्यांनी घटली आहे.

Web Title: Visitor's visit to rare visitors in Bhitarkanika

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.