'राजपूत नसते तर झुकले असते का, हा कोणता जातीवाद?' विवेक अग्निहोत्रींचा सिसोदियांना सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2022 03:16 PM2022-08-22T15:16:22+5:302022-08-22T15:17:49+5:30
अबकारी धोरण घोटाळ्याप्रकरणी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया सीबीआयच्या निशाण्यावर आहेत.
नवी दिल्ली: अबकारी धोरण घोटाळ्याप्रकरणी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया (manish sisodia) सीबीआयच्या (CBI) निशाण्यावर आहेत. मनीष सिसोदिया यांच्यावर सीबीआयच्या छापेमारीनंतर दिल्लीतील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. दरम्यान, मनीष सिसोदिया यांनी स्वतःच्या जातीवरुन केलेल्या वक्तव्याने खळबळ उडाली आहे. सिसोदियांच्या या वक्तव्यावर चित्रपट निर्माते विवेक अग्निहोत्री (vivek agnihotri) यांनी त्यांच्यावर निशाणा साधला.
विवेक अग्निहोत्री यांनी मनीष सिसोदिया यांना ट्विटद्वारे विचारले आहे की, हा कसला जातीवाद आहे? विवेक अग्निहोत्री यांनी सिसोदियांचे ट्विट रिट्विट करताना लिहिले की, "हा कोणत्या प्रकारचा जातिवाद आहे? मनीष सिसोदिया राजपूत नसते तर झुकले असते. म्हणजे दिल्लीत राहणारे ब्राह्मण, यादव, गुज्जर, जाट, शीख वगैरे सगळे झुकतात ? मुस्लिम, ख्रिश्चन, दलित ही सगळी झुकणारी जमात आहे का?' असा सवाल अग्निहोत्री यांनी उपस्थित केला.
विवेक अग्निहोत्रींचे ट्विट...
यह कैसा जातिवादी तर्क है? यानी अगर जनाब @msisodia जो राजपूत नहीं होते तो झुक जाते, कट जाते। यानी दिल्ली में जो ब्राह्मण,, यादव, गुज्जर, जाट, सिख इत्यादि रहते हैं वो सब झुकने वाले लोग हैं? मुस्लिम, ईसाई, दलित… क्या यह सब झुकने वाली क़ौम हैं? https://t.co/sahqNzcRM2
— Vivek Ranjan Agnihotri (@vivekagnihotri) August 22, 2022
मनीष सिसोदिया यांचे भाजपला प्रत्युत्तर
अबकारी धोरण घोटाळ्यामुळे आम आदमी पार्टी आणि भारतीय जनता पक्ष आमने-सामने आले आहेत. मनीष सिसोदिया यांनी सोमवारी त्यांच्या एका ट्विटद्वारे दावा केला की, त्यांना भाजपकडून आम आदमी पार्टीत फूट पाडून भाजपमध्ये येण्याची ऑफर देण्यात आली आहे. ते भाजपमध्ये आले, तर त्यांच्यावरील खटले मागे घेतले जातील. मात्र, भाजपने हे आरोप स्पष्टपणे फेटाळून लावले आहेत.
मेरे पास भाजपा का संदेश आया है- “आप” तोड़कर भाजपा में आ जाओ, सारे CBI ED के केस बंद करवा देंगे
— Manish Sisodia (@msisodia) August 22, 2022
मेरा भाजपा को जवाब- मैं महाराणा प्रताप का वंशज हूँ, राजपूत हूँ। सर कटा लूँगा लेकिन भ्रष्टाचारियो-षड्यंत्रकारियोंके सामने झुकूँगा नहीं। मेरे ख़िलाफ़ सारे केस झूठे हैं।जो करना है कर लो
सिसोदिया यांनी भाजपला दिलेल्या प्रत्युत्तरात लिहिले की, “माझे भाजपला उत्तर- मी राजपूत आहे, महाराणा प्रतापांचा वंशज आहे. मी माझे शीर छाटून घेऊन, पण भ्रष्ट-कारस्थानी लोकांसमोर झुकणार नाही. माझ्यावरील सर्व खटले खोटे आहेत. तुम्हाला जे काही करायचे ते करा."
सिसोदिया आरोपी नंबर एक
अबकारी धोरण घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने शुक्रवारी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या घरावर छापा टाकला. सीबीआयचा हा छापा अनेक तास चालला, त्यानंतर अधिकाऱ्यांनी मनीष सिसोदिया यांचा मोबाईल आणि लॅपटॉप ताब्यात घेतले. या प्रकरणी दाखल झालेल्या एफआयआरमध्ये सीबीआयने मनीष सिसोदिया यांना नंबर वन आरोपी बनवले आहे.