करून दाखवलं! वडिलांचं मोबाईल रिचार्जचं दुकान; मुलगा झाला EPFO मध्ये कमिश्नर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2024 01:44 PM2024-07-17T13:44:32+5:302024-07-17T14:01:14+5:30

Vivek Kumar : उत्तर प्रदेशच्या बांदा येथील विवेक कुमार गुप्ता याने या परीक्षेत २० वा क्रमांक पटकावला आहे. एपीएफ कमिशनर पदासाठी निवड झालेल्या विवेक कुमारने हे त्याची मेहनत आणि आई-वडिलांच्या आशीर्वादाचे फळ असल्याचं सांगितलं आहे.

Vivek Kumar gupta father runs mobile recharge shop got 20th rank in upsc epfo exam | करून दाखवलं! वडिलांचं मोबाईल रिचार्जचं दुकान; मुलगा झाला EPFO मध्ये कमिश्नर

करून दाखवलं! वडिलांचं मोबाईल रिचार्जचं दुकान; मुलगा झाला EPFO मध्ये कमिश्नर

UPSC ने कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) भरती परीक्षा २०२३ चा निकाल जाहीर केला आहे. असिस्टेंट प्रोविडेंट फंड कमिश्नर पदासाठी १५९ उमेदवार यशस्वी ठरले आहेत. उत्तर प्रदेशच्या बांदा येथील विवेक कुमार गुप्ता याने या परीक्षेत २० वा क्रमांक पटकावला आहे. एपीएफ कमिशनर पदासाठी निवड झालेल्या विवेक कुमारने हे त्याची मेहनत आणि आई-वडिलांच्या आशीर्वादाचे फळ असल्याचं सांगितलं आहे.

शहरातील कोतवाली भागातील छोटा बाजार येथील रहिवासी विवेक गुप्ता याची कामगार आणि रोजगार मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या UPSC EPFO ​​मध्ये असिस्टेंट कमिश्नर पदासाठी निवड झाली आहे. दुसऱ्या प्रयत्नात हे यश मिळवल्याचं विवेकने सांगितलं. विवेकच्या वडिलांचं एक मोबाईल रिचार्जचं दुकान आहे. त्यातूनच घरचा खर्च भागवला जातो. आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नाही, तरीही त्यांनी मुलांना शिक्षण देण्यात कोणतीही कसर सोडली नाही. त्याचाच परिणाम म्हणजे आज त्यांचा मुलगा यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाला आहे. 

आपल्या मुलाच्या यशाबद्दल आनंद व्यक्त करताना वडील आशिष गुप्ता म्हणाले की, ते त्यांच्या मुलांबद्दल नेहमी सजग असतात आणि त्यांना अभ्यासासाठी नेहमीच प्रेरित करतात. त्यांचा विश्वास बसत नाही, त्यांच्या मुलाने मेहनत केली आहे. आई आशा गुप्ता म्हणाल्या की, आपल्या मुलाच्या यशाबद्दल मला खूप आनंद झाला आहे, मुलं यशस्वी व्हावीत म्हणून नेहमी देवाकडे प्रार्थना करते. विवेकला एक लहान बहीण असून ती शिकत आहे.

विवेकचे शालेय शिक्षण बांदा येथील शाळेत झाले. येथून बारावी पूर्ण केल्यानंतर त्याने बांदा येथील एका प्रायव्हेट इन्स्टीट्यूटमधून बीटेक केलं. एमटेक केल्यानंतर विवेकने यूपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली. तयारीसाठी ते दिल्लीलाही गेले होते पण कौटुंबिक अडचणींमुळे त्याला परतावं लागलं. अनेक अडचणी येऊनही विवेकने हार मानली नाही आणि तयारी सुरूच ठेवली.

विवेकने पुस्तकं आणि यूट्यूबवरून कंटेंट घेऊन रात्रंदिवस मेहनत करून हे यश मिळवलं आहे. यूपीएससीची तयारी करणाऱ्या तरुणांना टिप्स देताना ते म्हणाले की, नवीन कंटेंटसह जुन्या उपक्रमांवर सतत लक्ष ठेवा, नोट्स बनवा, नियमित उजळणी करा, एक दिवस तुम्हाला नक्कीच यश मिळेल. तुमचा निर्धार पक्का असेल तर तुम्ही कोणतंही ध्येय गाठू शकता.
 

Web Title: Vivek Kumar gupta father runs mobile recharge shop got 20th rank in upsc epfo exam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.