३२ कोटींच्या अर्थसाहाय्यासाठी लढा विवेक ठाकरे : जनसंग्राम संघटनेतर्फे आज शेवमुरमुरे आंदोलन
By admin | Published: February 5, 2016 12:33 AM2016-02-05T00:33:01+5:302016-02-05T00:33:01+5:30
जळगाव : जिल्ातील ठेवीदारांच्या प्रश्नाबाबत लोकप्रतिनिधींमध्ये कमालीची उदासिनता आहे. ठेवीदारांना ३२ कोटी रुपयांचे अर्थसाहाय्य मिळावे या मागणीसाठी जनसंग्राम संघटना तीव्र लढा देणार असून शुक्रवार ५ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेवमुरमुरे आंदोलन करणार असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष विवेक ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
Next
ज गाव : जिल्ातील ठेवीदारांच्या प्रश्नाबाबत लोकप्रतिनिधींमध्ये कमालीची उदासिनता आहे. ठेवीदारांना ३२ कोटी रुपयांचे अर्थसाहाय्य मिळावे या मागणीसाठी जनसंग्राम संघटना तीव्र लढा देणार असून शुक्रवार ५ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेवमुरमुरे आंदोलन करणार असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष विवेक ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.ज्येष्ठ नागरिक, दुर्धर आजाराचे रुग्ण किंवा उपवर मुलामुलींचे पालक अशी वर्गवारी न करता सरसकट १ लाख रुपये ठेवीपोटी द्यावे असे त्यांनी सांगितले.ठेवीदारांचा प्रश्न कायमस्वरुपी निकाली निघावा यासाठी जिल्हा उपनिबंधक दर्जाचे स्वतंत्र वसुली अधिकारी तसेच रिक्त असलेल्या ६ ठिकाणी तालुका उपनिबंधक दर्जाचे अधिकारी मिळावे अशी मागणी त्यांनी केली. ४ जानेवारी रोजी लोकशाही दिनातील ९८० ठेवीदारांच्या तक्रारी दाखल दाखल व्हावी. तसेच जिल्ातील सुमारे १२०० ठेवीदारांना एक लाखाप्रमाणे १२ कोटी व यापूर्वीचे शासनास पाठविलेल्या प्रस्तावाचे २० कोटी रुपये अशा ३२ कोटी रुपयांचे अर्थसाहाय्य मिळावे अशी मागणी त्यांनी केली.बीएचआर पतसंस्थेच्या ४८ मालमत्तांचे दस्तऐवज लीलाव व विक्री प्रक्रियेसाठी एमपीआयडी कायद्याने ठेवी परत मिळण्यासाठी सक्षम प्राधिकारी द्यावे यासाठी शुक्रवार ५ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.