Vivek Tiwari Murder: धक्कादायक! पोलीस कॉन्स्टेबलनं गाडीच्या बोनटवर चढून विवेक तिवारींना घातल्या गोळ्या 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2018 09:49 AM2018-10-02T09:49:36+5:302018-10-02T09:51:29+5:30

उत्तर प्रदेशमधल्या गोमतीनगरमध्ये एका पोलीस कर्मचा-यानं अॅपलचे मॅनेजर विवेक तिवारींची गोळी मारून हत्या केली होती.

vivek tiwari post mortem report revealed up police sipahi prashant chaudhary fire from bonnet of car | Vivek Tiwari Murder: धक्कादायक! पोलीस कॉन्स्टेबलनं गाडीच्या बोनटवर चढून विवेक तिवारींना घातल्या गोळ्या 

Vivek Tiwari Murder: धक्कादायक! पोलीस कॉन्स्टेबलनं गाडीच्या बोनटवर चढून विवेक तिवारींना घातल्या गोळ्या 

Next

लखनऊः उत्तर प्रदेशमधल्या गोमतीनगरमध्ये एका पोलीस कर्मचा-यानं अॅपलचे मॅनेजर विवेक तिवारींची गोळी मारून हत्या केली होती. त्यानंतर या प्रकरणात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मध्यस्थी करून विवेक तिवारीच्या कुटुंबीयांना मदत केली होती. तसेच बसपाच्या मायावतींनीही या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे.

तसेच उत्तर प्रदेशमध्ये ब्राह्मण समाजातील लोकांचं मोठ्या प्रमाणात शोषण होत असल्याचंही मायावती म्हणाल्या होत्या. तर दुसरीकडे विवेक तिवारींचा पोस्टमार्टेम रिपोर्ट समोर आला आहे. या रिपोर्टनुसार विवेक तिवारीला उंचावरून गोळी मारण्यात आली आहे. विवेकच्या शरीरात गोळी वरून खाली गेली आहे. त्यामुळे पोलीस कॉन्स्टेबलनं गाडीच्या बोनटवर चढून विवेक तिवारींना गोळ्या घातल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच या प्रकरणात विवेक यांची पत्नी कल्पना तिवारी यांनी एफआयआर दाखल केलं असून, कॉन्स्टेबल प्रशांत चौधरी यांनी गाडीच्या काचेतून पिस्तूल ताणून गोळी मारल्याचं म्हटलं आहे.

विवेकच्या पत्नीचं एफआयआर आणि पोस्टमार्टेम रिपोर्टनुसार विवेकच्या गाडीच्या बोनटवर चढून गोळी मारण्यात आली आहे. कारण गोळी जर रस्त्यावरून मारली असती तर वरून शरीरात खालपर्यंत गेली नसती. रिपोर्टनुसार, विवेकच्या चेह-याच्या डाव्या बाजूला ब्लँक रेंजमध्ये गोळी मारण्यात आली आहे. 

Web Title: vivek tiwari post mortem report revealed up police sipahi prashant chaudhary fire from bonnet of car

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.