कोकणातील कलाकाराचे विवेकानंदांचे थ्री डी पोट्रेट कन्याकुमारीतील केंद्रात
By admin | Published: June 6, 2016 01:23 PM2016-06-06T13:23:26+5:302016-06-06T15:02:49+5:30
सावंतवाडीतील आनंद ठोंबरे यांनी काढलेले स्वामी विवेकानंदांचे थ्री डी पोट्रेट कन्या कुमारीतील केंद्रात ठेवण्यात येणार आहे.
Next
अनंत जाधव
सावंतवाडी, दि. ६ - कन्याकुमारीतील केंद्रात जागतिक दर्जाचे चित्रकार एस.एम.पंडित यांनी स्वामी विवेकानंदां काढलेले पोट्रेट जीर्ण झाल्याने ते बदलण्याचा निर्णय स्वामी विवेकानंद केंद्र समितीने घेतला आहे. एस.एम.पंडित यांनी काढलेल्या दर्जाचे पोट्रेट कोणाकडून काढून घ्यावे याची देशभर चाचपणी करण्यात आली असता त्यांना हे चित्र रेखाटण्यासाठी सावंतवाडीतील एक कलाकाराच्या रुपाने हिरा सापडला. विवेकानंदांचे हे पोट्रेट काढण्याचा मान आनंद ठोंबरे यांना मिळाला असून त्यांनी सावंतवाडीमधील स्टुडिओत हे 'थ्रीडी' पोट्रेट तयार केले आहे. हे पोट्रेट लवकरच ते कन्याकुमारीतील केंद्रात ठेवण्यात येणार असून त्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.