व्लादिमीर पुतिन यांचा छोटा पण 'पॉवर पॅक' भारत दौरा, अनेक महत्त्वाच्या करारांवर होणार शिक्कामोर्तब

By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2021 06:20 PM2021-12-05T18:20:35+5:302021-12-05T18:20:43+5:30

उच्चस्तरीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन उद्या(6 डिसेंबर) दुपारी दिल्लीत दाखल होतील. पुतिन फक्त 6-7 तास भारतात असतील आणि यादरम्यान त्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत बैठकही होणार आहे.

Vladimir Putin's short tour of India, He will meet PM Narendra Maodi and discus important issue | व्लादिमीर पुतिन यांचा छोटा पण 'पॉवर पॅक' भारत दौरा, अनेक महत्त्वाच्या करारांवर होणार शिक्कामोर्तब

व्लादिमीर पुतिन यांचा छोटा पण 'पॉवर पॅक' भारत दौरा, अनेक महत्त्वाच्या करारांवर होणार शिक्कामोर्तब

Next

नवी दिल्ली:रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन उद्या म्हणजेच 6 डिसेंबरला अत्यंत छोट्या पण महत्त्वाच्या दौऱ्यावर भारतात येत आहेत. अवघ्या काही तासांच्या या दौऱ्यात भारत आणि रशिया यांच्यातील संबंध पुढे नेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्याचबरोबर ऊर्जा ते अंतराळ तंत्रज्ञान आणि शस्त्रास्त्र निर्मिती क्षेत्रासह जवळपास डझनभर करारांवर शिक्कामोर्तब होणार आहेत.

उच्चपदस्थ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रशियाचे अध्यक्ष पुतिन दुपारी दिल्लीला पोहोचतील आणि ते फक्त 6-7 तास भारतात असतील. दिल्लीतील हैदराबाद हाऊसमध्ये सायंकाळी साडेपाच वाजता मोदी आणि पुतिन यांच्यात बैठक होईल. यादरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये प्रत्यक्ष आणि अनौपचारिक चर्चेाही होऊ शकते. नरेंद्र मोदींच्या भेटीनंतर पुतीन उद्याच रात्री साडेनऊच्या सुमारास रशियाला रवाना होतील.

आंतरराष्ट्रीय व्यापारावर चर्चा

भारत-रशिया शिखर परिषदेच्या तयारीशी संबंधित अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यादरम्यान दोन्ही देशांमध्ये अनेक महत्त्वाचे करार होणार आहेत. भारताला मध्य आशिया आणि रशियाशी जोडण्याचा मार्ग देणारा आंतरराष्ट्रीय उत्तर-दक्षिण व्यापार कॉरिडॉर सारख्या सर्वसमावेशक प्रकल्पाला पुढे नेण्याबद्दल चर्चा होईल. भारताने यापूर्वीच इराणमध्ये बांधलेल्या चाबहार बंदराला INSDC शी जोडण्याचा प्रस्ताव दिला आहे.

आधुनिक रायफल निर्मितीचा करार

राष्ट्राध्यक्ष पुतिन आणि पंतप्रधान मोदी यांच्यातील चर्चेत AK-203 असॉल्ट रायफलच्या संयुक्त उत्पादन करारावरही शिक्कामोर्तब होणार आहे. या अंतर्गत भारतातील अमेठी येथे 5 लाखांहून अधिक AK-203 प्रगत रायफल्सचे उत्पादन केले जाणार आहे. राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्या भेटीपूर्वी, भारतातील सुरक्षा-संबंधित बाबींवर सरकारची सर्वात शक्तिशाली संस्था असलेल्या CCS ने कराराच्या मसुद्याला मान्यता दिली. या रायफल निर्मिती प्रकल्पासाठी इंडो-रशियन रायफल प्रायव्हेट लिमिटेड या संयुक्त उपक्रमाची स्थापना करण्यात आली आहे. यामध्ये भारतीय कंपनी Advanced Weapon and Equipment India Limited आणि रशियाच्या Rosborone Export आणि Kalashnikov सारख्या कंपन्यांचा समावेश आहे. 


 

Web Title: Vladimir Putin's short tour of India, He will meet PM Narendra Maodi and discus important issue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.