व्होडाफोन, एअरटेल ग्राहकांना झटका देणार; सप्टेंबरपासून रिचार्ज महाग होण्याची शक्यता 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2020 02:27 PM2020-08-16T14:27:10+5:302020-08-16T14:28:20+5:30

कोरोना संक्रमन आणि ल़ॉकडाऊनमध्ये घरून काम करावे लागत असल्याने मोबाईल व हॉटस्पॉट इंटरनेटचा, कॉलिंगचा वापर कमालीचा वाढला आहे. लॉकडाऊनमुळे व्य़वसायांवर मोठा परिणाम झाला आहे.

Vodafone, Airtel to give a jolt; Recharge is likely to be expensive from September | व्होडाफोन, एअरटेल ग्राहकांना झटका देणार; सप्टेंबरपासून रिचार्ज महाग होण्याची शक्यता 

व्होडाफोन, एअरटेल ग्राहकांना झटका देणार; सप्टेंबरपासून रिचार्ज महाग होण्याची शक्यता 

googlenewsNext

टेलिकॉम कंपन्या ज्या प्लॅन आणि डेटासाठी 500 रुपयांपर्यंत आकारत होत्या त्या कंपन्यांनी रिलायन्स जिओ आल्यावर अगदी दीडशे रुपयांना अनलिमिटेड टॉकटाईम आणि अनलिमिटेड किंवा दिवसाला काही जीबी डेटा देण्यास सुरुवात केली होती. मात्र, डिसेंबर 2019 मध्ये परवडत नसल्याचे सांगत टेरिफ वाढविले होते. त्या कंपन्या आता पुन्हा रिचार्जचे प्लॅन वाढविणाच्या तयारीत आहेत. 


कोरोना संक्रमन आणि ल़ॉकडाऊनमध्ये घरून काम करावे लागत असल्याने मोबाईल व हॉटस्पॉट इंटरनेटचा, कॉलिंगचा वापर कमालीचा वाढला आहे. लॉकडाऊनमुळे व्य़वसायांवर मोठा परिणाम झाला आहे. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या असून अनेकांना कमी पगारात काम करावे लागत आहे. याचा फटका एअरटेल, व्होडाफेन, आयडियावरही बसला आहे. नुकसान भरून काढण्यासाठी या कंपन्य़ा पुन्हा एकदा त्यांचे प्लॅन महाग करण्याची शक्यता आहे.


गेल्या वर्षी स्वस्तातले प्लॅन 10 ते 40 टक्के महाग करण्यात आले होते. आता पुन्हा Airtel आणि Vodafone Idea टॅरिफ महाग करण्याची तय़ारी करत आहेत. हा दावा सीएनबीसीच्या एका वृत्तामध्ये करण्यात आला आहे. यानुसार सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये एअरटेल आणि व्होडाफोनचे प्लॅन 2 ते 5 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. तर प्रत्येक सहा महिन्यांसाठीच्या प्लॅनमध्ये 10 टक्क्यांची वाढ होऊ शकते. टेलिकॉम कंपन्यांनी यावर काही प्रतिक्रिया दिलेली नाही. 


दुसरीकडे एसबीआय कॅप्सचे विश्लेषक राजीव शर्मा य़ांनी आपल्य़ा अहवालात सांगितले की आणखी एकदा टॅरिफ महाग होण्याची शक्यता आहे. पुढील काही तिमाहींमध्ये ही वाढ होणार आहे. जुलैमध्ये मीडिया अँड एंटरटेनमेंट अँड टेलिकम्युनिकेशंसचे पदाधिकारी प्रशांत सिंघल यांनी सांगितले की सध्याची परिस्थिती पाहता असे वाटत आहे की, कंपन्या पुढील सहा महिन्यांत त्यांचे प्लॅनची रक्कम वाढवू शकतात. 

अन्य महत्वाच्या बातम्या...

हवामान बदल धोक्याचा; 'देवीसारखे जुने व्हायरस आयुष्यात परतणार', संशोधकांचा इशारा

शेतकरी सन्मान योजनेचे 2000 रुपये मिळाले नाहीत? अशी करा तक्रार

BOI Recruitment 2020 : बँक ऑफ इंडियात नोकरीची संधी; अर्जासाठी राहिलेत फक्त काही तास

TATA कंपनीला ब्रिटिशांचा 'टाटा'; मिळणार नाही बेलआऊट पॅकेज

भयावह! देशात कोरोनाबळींचा आकडा 50000 समीप; दिवसभरात 63 हजार नवे रुग्ण

मैदान सोडलय, क्रिकेट नाही! धोनीच्या नव्या कंपनीचे मुंबईत ऑफिस; कानोकान खबर नाही

चीनला दणका! अमेरिका तैवानला देणार लढाऊ विमानांची फौज

SBI मध्ये विनापरीक्षा नोकरीसाठी अर्ज केला का? आज शेवटचा दिवस

Web Title: Vodafone, Airtel to give a jolt; Recharge is likely to be expensive from September

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.