स्वयंसेवक करणार गर्दीचे व्यवस्थापन बहुजन क्रांती मोर्चा: आठ ठिकाणी वाहनतळे

By Admin | Published: October 22, 2016 12:44 AM2016-10-22T00:44:07+5:302016-10-22T00:46:19+5:30

अहमदनगर: बहुजन क्रांती मोर्चासाठी नाव नोंदणी करणार्‍या स्वयंसेवकांना शुक्रवारी गर्दीचे व्यवस्थापनाबाबत प्रशिक्षण देण्यात आले़ प्रशिक्षित सुमारे पाचशे तरुण मोर्चा मार्गावर कार्यरत राहणार असून, माजी सैनिकांची यासाठी मदत घेतली जाणार आहे, अशी माहिती संयोजन समितीच्या वतीने शुक्रवारी देण्यात आली़

Volunteer to manage the crowd Bahujan Kranti Morcha: eight places to park | स्वयंसेवक करणार गर्दीचे व्यवस्थापन बहुजन क्रांती मोर्चा: आठ ठिकाणी वाहनतळे

स्वयंसेवक करणार गर्दीचे व्यवस्थापन बहुजन क्रांती मोर्चा: आठ ठिकाणी वाहनतळे

googlenewsNext

अहमदनगर: बहुजन क्रांती मोर्चासाठी नाव नोंदणी करणार्‍या स्वयंसेवकांना शुक्रवारी गर्दीचे व्यवस्थापनाबाबत प्रशिक्षण देण्यात आले़ प्रशिक्षित सुमारे पाचशे तरुण मोर्चा मार्गावर कार्यरत राहणार असून, माजी सैनिकांची यासाठी मदत घेतली जाणार आहे, अशी माहिती संयोजन समितीच्या वतीने शुक्रवारी देण्यात आली़
येथील मंगल कार्यालयात बहुजन क्रांती मोर्चासाठी नाव नोंदणी करणार्‍या स्वयंसेवकांची बैठक घेऊन मार्गदर्शन करण्यात आले़ संयोजन समितीचे सदस्य अशोक गायकवाड, विजय वाकचौरे, सुरेश बनसोडे, किरण दाभाडे, अजय साळवे आदी यावेळी उपस्थित होते़ मोर्चाच्यानिमित्ताने लाखो समाज बांधव नगर शहरात एकत्र येणार आहेत़ शहरात आठ दिशेने मोर्चेकरी येणार आहे़ त्यादृष्टीने आठ वाहनतळे निर्माण करण्यात आली आहेत़ सुमारे तीन किलोमीटर अंतरावर वाहनतळे आहेत़ तेथून पुढे मोर्चेकरी पायी वाडियापार्क येथे येथील़ त्याठिकाणी पाच व्यक्तींची भाषणे होऊन मोर्चा चांदणी चौकात येणार आहे़ सर्व वाहनतळांवर प्रत्येकी १० स्वयंसेवक थांबणार आहेत़ तेथून पुढे एकही वाहन पुढे जाणार नाही, याची काळजी स्वयंसेवक घेतील़ तसेच मोर्चा मार्गावर दोन्ही बाजूंनी स्वयंसेवक उभे राहतील़ गर्दी नियंत्रणात ठेवणे, मोर्चेकर्‍यांना मार्गदर्शन करणे, सूचना देणे, आदी कामे स्वयंसेवकच करणार आहेत, असे यावेळी सांगण्यात आले़
़़़़़़़़़़
विविध समित्यांची स्थापना
मोर्चाचे नियोजन करण्यासाठी वाहनतळ, गर्दी व्यवस्थापन, वाहतूक नियोजन, फिरते पथक, समन्वय समिती आदी समित्यांची स्थापना करण्यात आली आहे़
़़़़़़़़़़़़
मोर्चावर सीसीटीव्हीचा वॉच
मोर्चा मार्गावर ठिकठिकाणी सीसीटीव्ही बसविण्यात येणार आहे़ त्याचे नियोजन करण्यात येणार असून, वाडिया पार्कसह इतर मार्गावर ते बसविले जाणार आहेत़
़़़़़
अशी आहे तयारी
५०० स्वयंसेवकांची नोंदणी
माजी सैनिकांचीही मदत घेणार
समता सैनिक दलाचीही निर्मिती
वाडियापार्क येथे भव्य व्यासपीठ
चांदणी चौकात घटनेचे वाचन
़़़़़़़़़़़़़़़
आज शहरातून रॅली
मोर्चाच्या प्रचार व प्रसारासाठी शनिवारी सकाळी वडगाव गुप्ता येथून मोटारसायकल रॅली काढली जाणार आहे़ तेथून ही रॅली नागापूर, बोल्हेगाव, प्रेमदान चौक, पत्रकार चौक, दिल्लीगेट, आयुर्वेद चौक, मार्केटयार्डमार्गे भिंगारला जाणार आहे़ भिंगार येथे रॅलीचा समारोप करण्यात येणार असल्याचे सुरेश बनसोडे यांनी सांगितले़

Web Title: Volunteer to manage the crowd Bahujan Kranti Morcha: eight places to park

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.