राष्ट्रपतिपदासाठी आज होणार मतदान!

By admin | Published: July 17, 2017 03:04 AM2017-07-17T03:04:31+5:302017-07-17T03:04:31+5:30

राष्ट्रपतिपदासाठी सोमवारी मतदान होत असून, भाजपाच्या नेतृत्वातील रालोआचे उमेदवार रामनाथ कोविंद यांचे पारडे जड मानले जात आहे.

Vote for the presidential election today! | राष्ट्रपतिपदासाठी आज होणार मतदान!

राष्ट्रपतिपदासाठी आज होणार मतदान!

Next

मतांचे एकूण मूल्य 10,98,882 मते आवश्यक 5,49,442 

नवी दिल्ली : राष्ट्रपतिपदासाठी सोमवारी मतदान होत असून, भाजपाच्या नेतृत्वातील रालोआचे उमेदवार रामनाथ कोविंद यांचे पारडे जड मानले जात आहे. विरोधकांच्या उमेदवार मीरा कुमार यांच्याकडून प्रादेशिक पक्षांचे समर्थन मिळविण्याचा प्रयत्न अखेरपर्यंत सुरू आहे.
रामनाथ कोविंद यांच्या बाजूने-
भाजपा, शिवसेना, पीडीपी, टीआरएस, अण्णाद्रमुक, वायएसआर काँग्रेस, बिजू जनता दल, जनता दल युनायटेड, तेलगु देसम पार्टी, लोकजनशक्ती पार्टी, शिरोमणी अकाली दल, एजीपी, एनपीपी, अपना दल.
मीरा कुमार यांच्या बाजूने-
काँग्रेस, तृणमूल, माकपा, राष्ट्रीय जनता दल, समाजवादी पार्टी, बसपा, भाकपा, जनता दल सेक्युलर, जेएमएम, डीएमके, एआययूडीएफ

लढाई लढावीच लागेल-

राष्ट्रपतिपदाची ही निवडणूक संकुचित, फूटपाडू व सांप्रदायिक विचारसरणीविरुद्धची लढाई आहे. संख्याबळ आमच्याविरुद्ध असले, तरी हा लढा निकराने द्यावाच लागेल. कारण अशा लोकांच्या दावणीला देश बांधू दिला जाऊ शत नाही. - सोनिया गांधी
एकही मत वाया घालवू नका-
या वेळची निवडणूक ऐतिहासिक आहे. सर्वच पक्षांनी या निवडणुकीच्या प्रतिष्ठेचे भान राखले. ही आपल्या परिपक्व लोकशाहीची खरी उंची आहे. आता एकही मत वाया जाणार नाही, याची आपल्याला खात्री करायची आहे.- नरेंद्र मोदी

Web Title: Vote for the presidential election today!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.