100व्या वाढदिवशी गिफ्ट म्हणून मिळालं मतदान ओळखपत्र
By admin | Published: May 6, 2016 01:11 PM2016-05-06T13:11:16+5:302016-05-06T13:11:16+5:30
कर्नाटकच्या कुन्नूर गावातील थरेस्सिम्मा यांना वयाच्या शंभराव्या वर्षी मतदान ओळखपत्र मिळालं आहे, आणि तेदेखील त्यांच्या शंभराव्या वाढदिवशी
Next
>ऑनलाइन लोकमत -
कन्नूर, दि. 06 - वयाची 18 पुर्ण झाल्यानंतर तुम्ही मतदान करु शकता, मात्र त्यासाठी मतदान ओळखपत्र असणं गरजेचं आहे. अनेकजण मतदान ओळखपत्र काढण्याचा कंटाळा करतात, पण जरी तुम्हाला मतदान ओळखपत्र काढावसं वाटलं तरी कधीपर्यंत वाट पाहाल ?...काय उत्तर द्यायचं सुचत नाही आहे ना..ऐकून आश्चर्य वाटेल पण कर्नाटकच्या कुन्नूर गावातील महिलेला वयाच्या शंभराव्या वर्षी मतदान ओळखपत्र मिळालं आहे, आणि तेदेखील त्यांच्या शंभराव्या वाढदिवशी. जिल्हाधिकारी पी बालाकिरण यांनी स्वत: थरेस्सिम्मा यांच्या घरी जाऊन त्यांना मतदान ओळखपत्र दिलं.
जिल्हाधिकारी पी बालाकिरण यांनी वाढदिवशी गिफ्ट म्हणून थरेस्सिम्मा यांना मतदान ओळखपत्र द्यायचं ठरवलं. यावेळी त्यांनी थरेस्सिम्मा यांनी मतदान करण्यासाठी ईव्हीएम मशिनचा वापर कसा करावा याचं प्रशिक्षणदेखील दिलं. '100 वर्षाच्या आजींनी मतदानात रस दाखवला ही खुप मोठी गोष्ट आहे. आणि तेदेखील पहिल्यांदाच त्यामुळे आम्ही त्यांचा सन्मान करण्याचं ठरवलं', अशी माहिती जिल्हाधिकारी पी बालाकिरण यांनी दिली आहे. केक कापून थरेस्सिम्मा यांचा वाढदिवस यावेळी साजरा करण्यात आला.
जिल्ह्यात शंभर वर्ष पुर्ण केलेले एकूण 163 मतदार आहेत. मात्र थरेस्सिम्मा एकमेव व्यक्ती आहे ज्यांनी एकदाही मतदान केलेलं नाही.