अवघ्या १० दिवसात घरी येईल Voter ID Card; फक्त या लिंकवर जाऊन करा अप्लाय!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2022 04:46 PM2022-08-01T16:46:36+5:302022-08-01T16:47:06+5:30

मतदान ओळखपत्र म्हणजेच तुमचं Voter ID Card बनवायचं असेल तर यासाठी आता वारंवार कार्यालयाचे फेरफटके मारण्याची गरज नाही.

Voter ID Card will come home in just 10 days Just go to this link and apply | अवघ्या १० दिवसात घरी येईल Voter ID Card; फक्त या लिंकवर जाऊन करा अप्लाय!

अवघ्या १० दिवसात घरी येईल Voter ID Card; फक्त या लिंकवर जाऊन करा अप्लाय!

Next

नवी दिल्ली-

मतदान ओळखपत्र म्हणजेच तुमचं Voter ID Card बनवायचं असेल तर यासाठी आता वारंवार कार्यालयाचे फेरफटके मारण्याची गरज नाही. अनेकदा अपुऱ्या कागदत्रांमुळे मतदान ओळखपत्र दिलं जात नाही. पण एक अशी सुविधा आहे की ज्यात तुम्हाला मतदान ओळखपत्र मिळवण्यासाठी तासंतास रांगेतही उभं राहावं लागणार नाही आणि अगदी घर बसल्या तुम्हाला तुमचं मतदान ओळखपत्र १० दिवसांत मिळून जाईल. 

नवं मतदान ओळखपत्र बनवणं आता खूप सोपं झालं आहे. ते बनवण्यासाठी तुमच्याकडे फक्त आवश्यक कागदपत्र उपलब्ध हवीत. यासाठी सर्वात आधी तुम्हाला निवडणूक आयोगाच्या (ECI) अधिकृत संकेतस्थळावर जावं लागेल. तिथं तुम्ही Voter ID Registration साठी अर्ज करू शकता. निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर सर्व प्रक्रिया उपलब्ध आहे. यात अनेक फॉर्म देखील उपलब्ध आहेत. जे तुम्ही ऑनलाइन पद्धतीनं डाऊनलोडही करू शकता. 

वेबसाइटवरुन तुम्ही तुमच्या सोयीनुसार फॉर्म डाऊनलोड करू शकता. तुम्हाला जर तुमच्या जुन्या मतदान ओळखपत्रात काही बदल करायचा असेल तर तीही सुविधा ऑनलाइन उपलब्ध आहे. सुरक्षा कर्मचारी आणि देशाबाहेर राहणाऱ्या भारतीय नागरिकांसाठी वेगळा फॉर्म आहे. नव्या मतदान ओळखपत्रासाठी Form 6 ची निवड करावी लागेल. सोबतच तुम्ही ऑनलाइन फॉर्म देखील जमा करू शकता. 

ऑनलाइन अर्ज कसा कराल?

स्टेप १- सर्वात आधी Election Commission Of India च्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या. 

स्टेप २- National Voters Services Portal वर क्लिक करा

स्टेप ३- "Apple Online For Registration of New Voter" या पर्यायावर क्लिक करा. 

स्टेप ४- फॉर्ममध्ये सर्व माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करा. 

स्टेप ५- अखेरीस "Submit" बटणावर क्लिक करा. 

सर्व माहिती भरून सबमिट केल्यानंतर तुम्हाला तुमच्या अधिकृत ई-मेल आयडीवर एक ईमेल येईल. यात एक लिंकही दिलेली असेल. या लिंकच्या माध्यमातून तुम्ही Voter ID Card Application Status ट्रॅक करू शकता. सर्व गोष्टी व्यवस्थित सादर केल्या असतील तर तुम्हाला तुमचं मतदान ओळखपत्र जास्तीत जास्त महिन्याभराच्या कालावधीत मिळून जाईल. अनेकांना तर मतदान ओळखपत्र अर्ज केल्याच्या अवघ्या १० दिवसांत प्राप्त झालेलं आहे.  

Web Title: Voter ID Card will come home in just 10 days Just go to this link and apply

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.