मतदार क्रमांक १४१ चे यंदाही मतदान नाहीच

By admin | Published: February 18, 2017 01:40 AM2017-02-18T01:40:41+5:302017-02-18T01:40:41+5:30

मतदार जागृतीसाठी निवडणूक आयोगाने प्रयत्न केल्यानंतरही लखनऊमध्ये विधासनभा मतदारसंघातील ‘मतदार क्रमांक १४१’ या वेळीही

Voter no. 141 is not voting yet | मतदार क्रमांक १४१ चे यंदाही मतदान नाहीच

मतदार क्रमांक १४१ चे यंदाही मतदान नाहीच

Next

लखनऊ : मतदार जागृतीसाठी निवडणूक आयोगाने प्रयत्न केल्यानंतरही लखनऊमध्ये विधासनभा मतदारसंघातील ‘मतदार क्रमांक १४१’ या वेळीही मतदान करू शकणार नाही. हा मतदार दुसरा तिसरा कोणी नसून, माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आहेत. ते लखनऊ मतदारसंघातून सलग पाच वेळा निवडून आले होते. लखनऊ मध्य मतदारसंघाच्या मतदार यादीत त्यांचे नाव आहे. तथापि, ते यावेळीही मतदान करू शकणार नाहीत. येत्या रविवारी मतदान होणार आहे.
माजी पंतप्रधान यावेळीही विधानसभा निवडणुकीसाठी मतदान करू शकणार नाहीत, असे वाजपेयी यांचे निकटचे सहकारी शिवकुमार यांनी शुक्रवारी वृत्तसंस्थेला सांगितले. वाजपेयी यांनी २००४ च्या लोकसभा निवडणुकीत शेवटचे मतदान केले होते. त्यानंतर २००७ आणि २०१२ ची विधानसभा निवडणूक तसेच २००९ आणि २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत प्रकृतीच्या कारणामुळे ते मतदान करू शकले नव्हते.
वाजपेयी १९९१, १९९६, १९९९ व २००४ मध्ये लखनौ मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. वाजपेयी ज्या मतदान केंद्रावरील मतदार आहेत ते मतदान केंद्र महापालिकेच्या कार्यालयाजवळ आहे.  वाजपेयी १९४२ मध्ये ‘चले जाव’ आंदोलनादरम्यान राजकारणात  आले होते. पंतप्रधानपदाचा  कार्यकाळ पूर्ण करणारे ते पहिले बिगर काँग्रेसी पंतप्रधान आहेत. (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: Voter no. 141 is not voting yet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.