चुकीच्या पत्त्याने ‘स्लिपां’पासून मतदार वंचित

By admin | Published: September 25, 2014 01:20 AM2014-09-25T01:20:19+5:302014-09-25T01:20:19+5:30

मागील लोकसभा निवडणूकीपासून निवडणूक आयोगाने मतदारांच्या नावांच्या स्लिपा घरोघरी नेऊन देण्याची यंत्रणा सुरू केली आहे

Voters deprived of 'slip' with wrong address | चुकीच्या पत्त्याने ‘स्लिपां’पासून मतदार वंचित

चुकीच्या पत्त्याने ‘स्लिपां’पासून मतदार वंचित

Next

भिवंडी : विधानसभा निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर झाला तरी निवडणूक कार्यालयीन यंत्रणेने मतदार यादीतील मतदारांचे चूकीचे पत्ते न बदलल्याने यावेळी देखील अनेक मतदार निवडणूक कार्यालयामार्फत वाटण्यात येणा-या मतदार स्लिपांपासून वंचीत रहाणार आहेत.
मागील लोकसभा निवडणूकीपासून निवडणूक आयोगाने मतदारांच्या नावांच्या स्लिपा घरोघरी नेऊन देण्याची यंत्रणा सुरू केली आहे.मतदार यादी बनविताना काही ठिकाणी एकाच घर नंबरावर अथवा ठिकाणावर ५० ते १००मतदारांची नांवे नोंद केली आहेत.मात्र प्रत्यक्षात ते दुसऱ्या पत्त्यावर रहात असतात. निवडणूक अधिकारी मतदार यादी नुसार मतदार स्लिपा बनवितात व घरोघरी वाटतात.अनेक ठिकाणी चुकीचा पत्ते नोंदविल्याने या स्लिपा मतदारांपर्यंत पोहोचत नाहीत.त्यामुळे निवडणूक कार्यालयाने केलेला खर्च वाया जातो व निवडणूक आयोगाचे उध्दीष्ट सफल होत नाहीत.वास्तविक शहरांतील बहुतेक नागरिकांनी आधारकार्ड बनविलेली आहेत.त्यावरील नोंदीचा आधार घेऊन ही दुरूस्ती निवडणूक आयोगाला शक्य आहे.अन्यथा त्याबाबत निवडणूक कार्यालयाने नवीन मोहिम राबवावी,अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Voters deprived of 'slip' with wrong address

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.