मतदार चिठ्ठी वाटपास सुरुवात

By admin | Published: February 17, 2017 10:02 PM2017-02-17T22:02:58+5:302017-02-17T22:02:58+5:30

महापालिका निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार यंदा प्रथमच मतदारांना घरबसल्या मतदार चिठ्ठीचे वाटप करण्यात येणार आहे.

The voters started sharing the note | मतदार चिठ्ठी वाटपास सुरुवात

मतदार चिठ्ठी वाटपास सुरुवात

Next



नाशिक :
महापालिका निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार यंदा प्रथमच मतदारांना घरबसल्या मतदार चिठ्ठीचे वाटप करण्यात येणार आहे. त्यानुसार, मतदार चिठ्ठी वाटपास महापालिकेने सुरुवात केली असून, त्याचा प्रारंभ महापालिका आयुक्त अभिषेक कृष्ण यांच्या निवासस्थानापासून करण्यात आला.
महापालिकेमार्फत मतदारांना घरोघरी मतदार चिठ्ठ्यांचे वाटप करण्यात येणार आहे. त्यासाठी अंगणवाडी सेविका, मदतनीस तसेच विभागीय कार्यालयांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची मदत घेण्यात येत आहे. सदर मतदार चिठ्ठी वाटपास शुक्रवारपासून सुरुवात झाली. आयुक्त अभिषेक कृष्ण यांना पहिल्यांदा मतदार चिठ्ठी देण्यात येऊन या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. पश्चिम विभागाचे विभागीय अधिकारी नितीन नेर यांनी श्री व सौ. कृष्ण यांना मतदार चिठ्ठी दिली. दरम्यान, येत्या तीन दिवसांत सदर मतदार चिठ्ठ्यांचे वाटप करण्यात येणार असून, त्यानंतर त्या-त्या मतदान केंद्राबाहेरील मदत कक्षात चिठ्ठ्या उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

Web Title: The voters started sharing the note

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.