मतदार कमी होणार-मस्ट-अवश्य वापरावी

By Admin | Published: August 26, 2015 11:32 PM2015-08-26T23:32:36+5:302015-08-26T23:32:36+5:30

तब्बल २१ लाख मतदार

The voters will be less-must-use | मतदार कमी होणार-मस्ट-अवश्य वापरावी

मतदार कमी होणार-मस्ट-अवश्य वापरावी

googlenewsNext
्बल २१ लाख मतदार
कमी होण्याची शक्यता

- आयोगाकडून नोटीस : १ ऑक्टोबरपर्यंत उत्तर अपेक्षित
मुंबई : राज्यातील मतदार याद्यांमधून तब्बल २१ लाखांहून अधिक मतदार कमी होण्याची शक्यता आहे. दोन ठिकाणी नावे असलेले, स्थानांतर झालेले किंवा मृत झालेल्या मतदारांचा त्यात समावेश आहे.
निवडणूक आयोगाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी सांगितले की, आमच्या यंत्रणेच्या माध्यमातून घरोघरी जाऊन या संबंधी माहिती गोळा करण्यात आली आणि वरील प्रकारची २१ लाख ४० हजार ९५४ नावे काढण्यात आली. आता या सर्वांना किंवा त्यांच्या घरी नोटीस पाठविण्यात आल्या आहेत. त्यांची नावे मतदार यादीतून का वगळू नयेत, अशी विचारणा नोटीशीत करण्यात आली आहे. या नोटीशींचे उत्तर १ ऑक्टोबरपर्यंत स्वीकारण्यात येईल.
स्पष्टीकरण समाधानकारक नसेल तर नाव यादीतून वगळले जाईल. आयोगाने आपल्या वेबसाईटवरही ही नावे टाकली आहेत. ज्या जिल्‘ांमधील सर्वाधिक नावे वगळण्याचे प्रस्तावित आहे. त्यात पुणे, ठाणे, नाशिक, मुंबई उपनगर, पालघर आदींचा समावेश आहे. (विशेष प्रतिनिधी)
-----------------------------------
प्रस्तावित यादी
कोणत्या जिल्‘ात किती मतदार वगळण्याचा प्रस्ताव आहे याबाबतची आकडेवारी अशी - नंदूरबार - ३१३३५, धुळे - १०३५२, जळगाव - २६२०२, बुलडाणा - ९९०३, अकोला - ७८१९, वाशीम- ३८२९, अमरावती - २९६००, वर्धा - ५८७७, नागपूर - २२२२७, भंडारा - ५६६३, गोंदिया - ४०२, गडचिरोली - ६०३०, चंद्रपूर - ४८८१, यवतमाळ - २७८५९, नांदेड - ६३०२९, हिंगोली - ५६४४, परभणी - ४७६४, जालना - ५१०६, औरंगाबाद - ३४८११, नाशिक - १७३५००, पालघर -५४६०९, ठाणे -३७४१४२, मुंबई उपनगर - ९०२५४०, मुंबई शहर - २१२५३, रायगड - १६२५५, पुणे - १३२१७८, अहमदनगर - १२९८२, बीड - ४९४७, लातूर - १०३७८, उस्मानाबाद - ९२२१, सोलापूर - ३४६८५, सातारा - ३५४८१, रत्नागिरी - २८१९८, सिंधुदुर्ग - ५११४, कोल्हापूर - २३१३८. एकूण - २१,४०,९५४.
-----------------------------------

Web Title: The voters will be less-must-use

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.