विधानसभेच्या 20 जागांसाठी मतदान सुरू, दिग्गजांचे भवितव्य EVM मध्ये बंद होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2019 07:42 AM2019-12-07T07:42:48+5:302019-12-07T07:43:24+5:30
अखिल झारखंड विद्यार्थी संघटनेशी (एजेएसयू) पक्षाचे मतभेद झालेले असून, ते दूर करण्यात अद्याप यश मिळालेले नाही.
रांची - झारखंड विधानसभा निवडणुकांतील दुसऱ्या टप्प्याच्या मतदानाला सकाळी 7 वाजल्यापासून सुरुवात झाली. दुसऱ्या टप्प्यात 20 जागांवर मतदान होत असून 260 उमेदवारांचे भवितव्य आज ईव्हीएम मशिनमध्ये बंद होणार आहे. राज्यातील 81 सदस्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने 65 जागा जिंकण्याचे लक्ष्य समोर ठेवले असले, तरी या पक्षाला बहुरंगी लढतींचा मुकाबला करावा लागत आहे. भाजपला सत्ता टिकवण्यासाठी ही महत्त्वपूर्ण लढत द्यायची असून, आता एकाच वेळी अनेकांशी दोन हात करावे लागणार आहेत.
राज्यात पाच टप्प्यांत निवडणुका होत असून, 30 नोव्हेंबर रोजी मतदानाचा पहिला टप्पा पार पडला. येथील मतदानाचा दुसरा टप्पा अतिशय महत्त्वाचा मानला जातो. कारण, आदिवासीबहुल भागातील अनुसूचित जातींसाठी 20 पैकी 16 मतदारसंघ आरक्षित आहेत. विशेष म्हणजे दुसऱ्या टप्प्यात मुख्यमंत्री रघुवर दास, विधानसभा अध्यक्ष दिनेश उराव आणि भाजपा अध्यक्ष लक्ष्मण गिलुआ यांसारखे दिग्गज मैदानात आहेत. दुसऱ्या टप्प्यात बहरागोड़ा, घाटशिला, पोटका, जुगसलाई, जमशेदपुर पूर्व, जमशेदपुर पश्चिम, सरायकेला, चाईबासा, मंझगांव, जगन्नाथपुर, मनोहरपुर, चक्रधरपुर, खरसावां, तमाड़, तोरपा, खूंटी, मांडर, सिसई, सिमडेगा आणि कोलेबिरा या मतदारसंघात मतदान होत आहे.
Jharkhand: Voting for the second phase of assembly elections to be held in the state today. Visuals from a polling station in Khunti. #JharkhandAssemblyPollspic.twitter.com/lFpYhyjncu
— ANI (@ANI) December 7, 2019