मतदान यंत्रांवर खापर

By admin | Published: March 16, 2017 12:34 AM2017-03-16T00:34:45+5:302017-03-16T00:34:45+5:30

बहुजन समाज पार्टीच्या प्रमुख मायावती आणि आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी त्यांच्या पक्षांच्या अनुक्रमे उत्तर प्रदेश व पंजाब विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाचे

Voting on polling machines | मतदान यंत्रांवर खापर

मतदान यंत्रांवर खापर

Next

लखनऊ/ नवी दिल्ली : बहुजन समाज पार्टीच्या प्रमुख मायावती आणि आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी त्यांच्या पक्षांच्या अनुक्रमे उत्तर प्रदेश व पंजाब विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाचे खापर मतदान यंत्रांवर फोडले व या दोन्ही राज्यांत भारतीय जनता पार्टीने मतदान यंत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर गडबड केल्याचा आरोप केला.
लखनऊमध्ये पत्रकारांना मायावती म्हणाल्या की, भाजपाला मिळालेले यश हे ‘अप्रामाणिकपणा’ आणि ‘लबाडी’ने मिळाले आहे.भाजपाने मतदान यंत्रांमध्ये गडबड केल्याने प्रत्यक्षात आमच्या बाजूने पडलेली मते मोठ्या प्रमाणावर त्यांच्याकडे वळविली गेली. मणिपूर व गोवा यासारख्या छोट्या राज्यांमध्येही गडबड केली असती तर बिंग फुटले असते. शिवाय उत्तर प्रदेशमध्ये जे केले त्याला उत्तर द्यायला जागा राहावी म्हणून भाजपाने इतर राज्यांमध्ये अशी लबाडी ेकली नाही, असा त्यांनी आरोप केला. मायावती म्हणाल्या की. मतमोजणी सुरू असातनाच आम्ही हा विषय निवडणूक आयोगाकडे नेला. पण आयोगाकडून समाधानकारक उत्तर मिळाले नाही. त्यामुळे आता याविरुद्ध न्यायालयातही दाद मागितली जाईल. लोकशाहीचा हा खून ११ तारखेला झालेला असल्याने बसपा प्रत्येक महिन्याच्या ११ तारखेला ‘काळ दिवस’ पाळेल आणि त्या दिवशी निषेध धरणे धरले जाईल. मावळत्या विधनसभेत ८०आमदार असलेल्या बसपाचे नव्या विधानसभेत फक्त १९ सदस्य निवडून आले आहेत.


पराभवाने मानसिक संतुलन बिघडल्याने केजरीवाल अशी बडबड करत आहेत. पंजाबच्या मतदारांनी नाकारले हे त्यांनी मान्य करावे. दिल्लीत ७० पैकी ६७ जागा ‘आप’ला मिळाल्या तेव्हा केजरीवाल यांनी अशी तक्रार केली नव्हती. आरोप करण्याऐवजी केजरीवाल यांनी ‘विपस्यना’ करावी आणि दिल्लीच्या राज्य कारभाराकडे अधिक लक्ष द्यावे.
- हरसिमरन कौर बादल,
केंद्रीय मंत्री व अकाली दल नेत्या


प्रत्येत राजकीय पक्ष पराभव झाल्यावर अशी तक्रार करत असतो व जिंकल्यावर तो गप्प बसतो. त्यामुळे त्यांच्यासाठी नव्हे तर मतदारांच्या मनात कोणताही किंतू राहू नये यासाठी निवडणूक आयोगाने सक्रियतेने व आक्रमकतेने मतदान यंत्रांविषयीच्या शंका-कुशंकांचे ठामपणे निरसन करायला हवे. शिवाय २०१९ च्या निवडणुकीत् मतदारांना मतदानाची लेखी पोचपावती देण्याचे वचन आयोगाने सर्वोच्च न्यायालयास दिले आहे. त्यासाठीही तयारी करावी.
- एस. वाय. कुरेशी,
माजी मुख्य निवडणूक आयुक्त

Web Title: Voting on polling machines

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.