२३ ग्रामपंचायतींसाठी १७ एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया सुरु : २१ रोजी निकाल
By admin | Published: March 15, 2016 12:35 AM2016-03-15T00:35:00+5:302016-03-15T00:35:00+5:30
जळगाव : राज्य निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. जळगाव जिल्ातील २३ ग्रामपंचायतींसाठी १७ एप्रिल रोजी मतदान होणार असून अंतिम निकाल २१ रोजी प्रसिद्ध होणार आहे.
Next
ज गाव : राज्य निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. जळगाव जिल्ातील २३ ग्रामपंचायतींसाठी १७ एप्रिल रोजी मतदान होणार असून अंतिम निकाल २१ रोजी प्रसिद्ध होणार आहे.राज्य निवडणूक आयोगाचे साहाय्यक आयुक्त के.सूर्यकृष्णमूर्ती यांनी मे ते ऑगस्ट २०१६ या कालावधित मुदत संपणार्या तसेच नव्याने अस्तित्वात आलेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक व रिक्त पदांच्या पोटवणुक घेण्याबाबत निवडणूक कार्यक्रम घोषित केला आहे. त्यानुसार शुक्रवार १८ रोजी निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करण्यात येणार आहे.२९ मार्च ते २ एप्रिल दरम्यान सकाळी ११ ते दुपारी तीन या वेळेत नामनिर्देशनपत्रे सादर करण्यात येणार आहे. ४ एप्रिल रोजी आलेल्या नामनिर्देशन पत्राची छाननी करण्यात येणार आहे.बुधवार ६ एप्रिल रोजी नामनिर्देशनपत्र मागे घेण्यात येणार आहे. याच दिवशी दुपारी तीन वाजेनंतर निवडणूक चिन्ह वाटप तसेच उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.रविवार १७ एप्रिल रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० यावेळेत २३ ग्रामपंचायतींसाठी मतदान प्रक्रिया होणार आहे. त्यानंतर जिल्हाधिकार्यांच्या मान्यतेने तहसीलदार निश्चित करतील त्या ठिकाणी मतमोजणी होणार आहे. गुरुवार २१ रोजी ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल प्रसिद्ध करण्यात येणार आहे.या ग्रामपंचायतींमध्ये निवडणूकयावल तालुका : मालोद, परसाडे बुद्रुक. रावेर तालुका : जिन्सी, कुसुंबे बुद्रुक, कुसुंबे खुर्द, लोहारे, मोहमांडली, निमड्या, पाडळे बुद्रुक, पाल, सहस्त्रलिंग, पिंप्री, मंगरुळ-जुनोने. चोपडा तालुका : उमर्टी, सत्रासेन, मोरचिडा, कर्जाणे, कृष्णापूर, वैजापूर, मेलाणे, देव्हारी, बोरअजंती, मोहरद या २३ ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक होणार आहे.