व्यंकय्या नायडू देशाचे नवीन उपराष्ट्रपती
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2017 05:28 PM2017-08-05T17:28:10+5:302017-08-05T19:24:20+5:30
उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत व्यंकय्या नायडू यांचा विजय झाला आहे. त्यांना 516 मते मिळाली.
नवी दिल्ली, दि. 5- राष्ट्रपतिपदापाठोपाठ उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीतही भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीने बाजी मारली आहे. एनडीएचे उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार व्यंकय्या नायडू यांनी मोठया मताधिक्क्याने विजय मिळवला आहे. पहिल्या फेरीपासून व्यंकय्या नायडू आघाडीवर होते.
एकूण 771 लोकप्रतिनिधींनी मतदानाचा हक्क बजावला.व्यंकय्या नायडू यांना 516 तर, विरोधी पक्षांचे उमेदवार गोपाळकृष्ण गांधी यांना 244 मते मिळाली. 11 मते बाद गेली. या निवडणुकीचे आणखी एक वैशिष्टय म्हणजे नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दलाने गोपाळकृष्ण गांधी यांना मतदान केले.
मागच्या आठवडयात नितीश कुमारांनी काँग्रेस प्रणीत युपीएची साथ सोडून बिहारमध्ये भाजपासोबत आघाडी करुन सरकार स्थापन केले. नितीश कुमारांनी आधीच उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत गोपाळकृष्ण गांधी यांना मतदान करणार असल्याचे जाहीर केले होते.
{{{{twitter_post_id####
Congratulations to @MVenkaiahNaidu Garu on being elected India’s Vice President. My best wishes for a fruitful & motivating tenure.
— Narendra Modi (@narendramodi) August 5, 2017
उपराष्ट्रपतिपदासाठीचं मतदान संपलं असून आता सहा वाजता मतमोजणीला सुरूवात झाली. 785 खासदारांपैकी 771 खासदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी एकुण 98.21 टक्के मतदान झालं आहे. सकाळी 10 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, खासदार सचिन तेंडुलकर, अभिनेत्री रेखा यांनीही मतदानाचा हक्क बजावला.
Voting for Vice Presidential Election ends. Total 771 out of 785 votes polled, 98.21% poll percentage recorded.
— ANI (@ANI_news) August 5, 2017
मतदानाची सुरूवात झाल्यावर सत्ताधारी एनडीए आघाडीचे उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार व्यंकय्या नायडू यांनी सुरुवातीलाच मतदान केलं. पंतप्रधान मोदी यांनी स्वत: ट्विट करून मतदान केल्याची माहिती दिली.
व्यंकय्या नायडू यांची प्रतिक्रिया
मतदानापूर्वी रालोआचे उमेदवार एम. व्यंकय्या नायडू यांनी अशी प्रतिक्रिया दिली की, मी कुणाही विरोधात लढत नाहीय आणि आता मी कोणत्याही पक्षाचा सदस्य नाही. मी उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक लढत आहे आणि अनेकांनी मला समर्थन दिले आहे. त्यामुळे ते सर्व निवडणुकीत मतदान करतील असा विश्वास आहे.
#Delhi: NDA's Vice Presidential candidate Venkaiah Naidu reached Parliament to cast vote #VicePresidentialElectionpic.twitter.com/CeqGzi2zs3
— ANI (@ANI_news) August 5, 2017
#VicePresidentialElection: MPs arrive to cast their votes in Parliament. pic.twitter.com/BwYbFBQEEy
— ANI (@ANI_news) August 5, 2017
}}}}#VicePresidentialElection: Former PM Manmohan Singh, Congress VP Rahul Gandhi, former deputy PM Lal Krishna Advani at Parliament. pic.twitter.com/7WokgSGHd3
— ANI (@ANI_news) August 5, 2017
विद्यमान उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांचा कार्यकाळ १० आॅगस्ट रोजी संपत आहे. ते सलग दोन वेळा या पदावर राहिले आहेत. उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतदानाचा अधिकार संसदेच्या दोन्ही सभागृहांतील निवडून आलेल्या आणि नियुक्त सदस्यांना असतो. दोन्ही सभागृहातील सदस्यांची एकूण संख्या ७९० आहे. पण, लोकसभेत दोन आणि राज्यसभेत एक जागा रिक्त आहे. याशिवाय लोकसभा सदस्य छेदी पासवान यांना न्यायालयाच्या एका
निर्णयानंतर मतदानासाठी बंदी करण्यात आली आहे.
राज्यसभेत भाजपाला ‘बळ’
लोकसभेतील एकूण ५४५ सदस्यांपैकी भाजपाचे २८१ सदस्य आहेत. तर, भाजपाच्या नेतृत्वातील रालोआचे एकूण ३३८ सदस्य आहेत, तसेच २४३ सदस्यीय राज्यसभेत भाजपाचे एकूण ५८ सदस्य आहेत. सभागृहातील सर्वात मोठा पक्ष असलेल्या काँग्रेसचे ५७ सदस्य आहेत. भाजपा आजच राज्यसभेतील सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरी त्या सभागृहात विरोधी सदस्यांची संख्या रालोआपेक्षा अधिक आहे.