जागा वाटपावरून वादंग कायम ; अंतर्गत बैठका सुरू
By admin | Published: July 9, 2015 09:53 PM2015-07-09T21:53:14+5:302015-07-10T00:34:50+5:30
सिंहस्थ कुंभमेळा : जगदगुरू हंसदेवाचार्यंची मध्यस्थी
सिंहस्थ कुंभमेळा : जगदगुरू हंसदेवाचार्यंची मध्यस्थी
पंचवटी : सिंहस्थ कुंभमेळयानिमित्ताने साधूग्राममध्ये आखाडयांना सुरू असलेल्या जागावाटपावरून आखाडा परिषद व अन्य आखाडयांत वादंग सुरू असुन ते दुपारी गुरूवारपर्यंत कायम होते. आखाडयांत सुरू असलेले वाद मिटविण्यासाठी हरिद्वारच्या जगदगुरू हंसादेवाचार्य यांनी पुढाकार घेऊन दोन्ही आखाडयांच्या महंतांचे म्हणणे ऐकून घेत वाद मिटविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
बुधवारपासून जागावाटपाच्या कारणावरून गोंधळ सुरू झाला आहे. गुरूवारी दुपारपर्यंत हे वाद मिटलेले नव्हते. हरिद्वार येथिल जगदगुरू हंसादेवाचार्य यांनी सकाळी दिगंबर आखाडयाचे रामकिशोरदास शास्त्री तसेच आखाडा परिषदेचे महंत ग्यानदास महाराज यांची भेट घेऊन वाद मिटविण्याबाबत चर्चा केली. हंसादेवाचार्य यांनी दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून घेतले असुन त्यातील काही प्रश्न मार्गी लागले आहेत मात्र काही मोजक्या मुद्दयावरून चर्चा अडून राहिली आहे. हंसादेवाचार्य यांनी मध्यस्थी करण्यासाठी पुढाकार घेतल्याने दुपारपर्यंत आखाडयांमधील वाद संपुष्टात येतील असे साधूमहंतांनी स्पष्ट केले आहे. आखाडयांना मोक्याच्या ठिकाणी जागा मिळाव्यात याच मुख्य कारणावरून आखाडा परिषदेचे अध्यक्ष व अन्य आखाडयांच्या महंतात वादंगाला सुरूवात झाली होती. (वार्ताहर)