यूपी, उत्तराखंडमध्ये मतदान जोरात
By Admin | Published: February 16, 2017 05:21 AM2017-02-16T05:21:19+5:302017-02-16T05:21:19+5:30
उत्तर प्रदेशात विधानसभेच्या दुसऱ्या टप्प्यात ६७ जागांसाठी बुधवारी ६५.५ टक्के मतदान झाले. उत्तराखंडात एकाच टप्प्यात ६९ जागांसाठीही आज मतदान
नवी दिल्ली : उत्तर प्रदेशात विधानसभेच्या दुसऱ्या टप्प्यात ६७ जागांसाठी बुधवारी ६५.५ टक्के मतदान झाले. उत्तराखंडात एकाच टप्प्यात ६९ जागांसाठीही आज मतदान झाले आणि त्यात ६८ टक्के मतदार सहभागी झाले, असे निवडणूक आयोगातर्फे सांगण्यात आले.
लढत कोणामध्ये...
दोन्ही राज्यांत काही केंद्रांवर मतदान यंत्रांत बिघाड झाल्याने ती बदलण्यात आली. उत्तर प्रदेशात यंदा समाजवादी पक्ष-काँग्रेस, भाजपा आणि बहुजन समाज पार्टी यांच्यात, तर उत्तराखंडात काँग्रेस व भाजपामध्येच लढत आहे.