५ पदवीधर, शिक्षक मतदारसंघांत ३० जानेवारीला होणार मतदान; मतमोजणी २ फेब्रुवारीला
By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2022 05:22 AM2022-12-30T05:22:15+5:302022-12-30T05:23:14+5:30
विधान परिषदेसाठी पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची केंद्रीय निवडणूक आयोगाने घोषणा केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली:विधान परिषदेसाठी पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची केंद्रीय निवडणूक आयोगाने गुरुवारी घोषणा केली. येत्या ३० जानेवारीला या निवडणुकांसाठी मतदान, तर मतमोजणी २ फेब्रुवारीला हाेईल. नाशिक व अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघ तसेच औरंगाबाद, नागपूर व कोकण विभाग शिक्षक मतदारसंघासाठी ५ जानेवारीला अधिसूचना जारी होणार आहे.
नाशिक पदवीधरचे काँग्रेसचे डॉ. सुधीर तांबे, अमरावती पदवीधरमध्ये भाजपचे डॉ. रणजित पाटील, औरंगाबाद शिक्षक मतदारसंघात राष्ट्रवादीचे विक्रम काळे, नागपूर शिक्षकचे भाजपचे नागोराव गाणार व कोकण शिक्षकचे अपक्ष बाळाराम पाटील यांची मुदत ७ फेब्रुवारीला संपेल.
निवडणुकीचा कार्यक्रम
अर्ज भरण्यासाठी मुदत १२ जानेवारी
अर्जाची छाननी १३ जानेवारी
मागे घेण्याची मुदत १६ जानेवारी
मतदान ३० जानेवारी
मतमोजणी २ फेब्रुवारी
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"