वाघूर ठिकठाक तर हतनूर जेमतेम
By admin | Published: April 4, 2016 12:40 AM2016-04-04T00:40:10+5:302016-04-04T00:40:10+5:30
वाघूर ठिकठाक तर हतनूर जेमतेम
Next
व घूर ठिकठाक तर हतनूर जेमतेमजळगाव शहराला पाणी पुरवठा करणार्या वाघूर धरणाची स्थिती चांगली आहे. या धरणात५२९२ दलघफू इतका पाणी साठा आहे. हतनूर धरणाची परिस्थिती जेमतेम आहे. यात २२८१ दलघफू साठा आहे. या साठ्यात एप्रिल, मे व जून महिन्याचे काही दिवस पाणी पुरविण्याचे आव्हान आहे. १३ मध्यम प्रकल्पांपैकी मन्याड, बोरी, भोकरबारी, अग्नावती, हिवरा, बहुळा, अंजन या मध्यम प्रकल्पातील जिवंत साठा देखील संपला आहे. सुकी व मंगरुळ धरणात काही प्रमाणात पाणीसाठा असला तरी तो पुरविण्यासाठी दोन महिने मोठे कष्ट करावे लागणार आहेत.पाणीबाणीत पाणीबचत हाच पर्यायजळगाव शहर वगळता जिल्ह्यात पाणीबाणी सारखी स्थिती निर्माण झाली आहे. जिल्हा प्रशासन आपल्या परीने पाणी टंचाईच्या निवारणासाठी प्रयत्न देखील करीत आहे. मात्र विहिर, कूपनलिका व मोठ्या व मध्यम प्रकल्पात पाणीसाठा नसल्याने प्रशासन देखील हतबल ठरत आहे. त्यामुळे पाणी टंचाईच्या या काळात पाणी बचत हाच एकमेव पर्याय शिल्लक आहे. त्यामुळे नागरिकांनी देखील पाणी वाया घालवू नये असे आवाहन करण्यात येत आहे.