कारवाईसाठी अहलवालाची प्रतीक्षा तलाठी लाच प्रकरण : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून अद्याप अहवाल नाही

By admin | Published: February 21, 2016 12:30 AM2016-02-21T00:30:40+5:302016-02-21T00:30:40+5:30

जळगाव : सात बारा उतार्‍यावरील नाव कमी करण्यासाठी दीड हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडलेल्या तलाठी सत्यजित अशोक नेमाने यांच्यावर अद्याप महसूल विभागाकडून कोणतीही कारवाई झाली नाही. या संदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा अहवाल अद्याप आला नसल्याचे प्रांताधिकारी अभिजित भांडे पाटील यांनी सांगितले.

Waiting for Ahlawala for action Tally Bribery Case: The Anti Corruption Bureau does not yet have a report | कारवाईसाठी अहलवालाची प्रतीक्षा तलाठी लाच प्रकरण : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून अद्याप अहवाल नाही

कारवाईसाठी अहलवालाची प्रतीक्षा तलाठी लाच प्रकरण : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून अद्याप अहवाल नाही

Next
गाव : सात बारा उतार्‍यावरील नाव कमी करण्यासाठी दीड हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडलेल्या तलाठी सत्यजित अशोक नेमाने यांच्यावर अद्याप महसूल विभागाकडून कोणतीही कारवाई झाली नाही. या संदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा अहवाल अद्याप आला नसल्याचे प्रांताधिकारी अभिजित भांडे पाटील यांनी सांगितले.

सावखेडा बु.ता.जळगाव येथील तक्रारदार व चार बहिणी यांची सावखेडा येथे वडीलोपार्जित सामाईक शेतजमीन आहे. या शेतीच्या सात बारा उतार्‍यावरील नाव कमी करण्यासाठी तक्रारदारांनी १६ फेब्रुवारी रोजी पिंप्राळा सजाचे तलाठी नेमाने याच्याकडे अर्ज दिला होता. नेमाने याने त्यासाठी दीड हजार रुपयांची मागणी केली. त्यामुळे तक्रारदारांनी याबाबत लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार तलाठी नेमाने हे उखर्डु सोनवणे याच्यामार्फत दीड हजार रुपयांची लाच स्विकारतांना रंगेहाथ सापडले होते.
त्यांच्यासोबतच सेवानिवृत्त कोतवाल उखर्डु पांडू सोनवणे यांनाही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले होते. दोघांवर रामानंद नगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली होती.
या संदर्भात महसूल विभागाने नेमाने यांच्यावर काय कारवाई केली याबाबतची माहिती घेतली असता, प्रांताधिकारी अभिजित भांडे पाटील यांनी सांगितले की, लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून अहवाल आलेला नाही. तो सोमवार अथवा मंगळवारी मिळू शकतो. त्यामुळे सध्या त्यांच्यावर काही कारवाई करण्यात आलेली नाही.

Web Title: Waiting for Ahlawala for action Tally Bribery Case: The Anti Corruption Bureau does not yet have a report

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.