रेल्वेची महत्त्वाची योजना; प्रतीक्षा यादी संपणार, सर्व तिकिटं निश्चित होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2020 03:08 AM2020-12-19T03:08:40+5:302020-12-19T06:59:54+5:30

‘एनआरपी २०३०’ ही योजना सार्वजनिक सल्लामसलतीसाठी, तसेच विविध हितधारक आणि मंत्रालयाकडून अभिप्राय मागविण्यासाठी सार्वजनिक करण्यात येणार आहे. 

Waiting list for trains to end All tickets are confirmed | रेल्वेची महत्त्वाची योजना; प्रतीक्षा यादी संपणार, सर्व तिकिटं निश्चित होणार

रेल्वेची महत्त्वाची योजना; प्रतीक्षा यादी संपणार, सर्व तिकिटं निश्चित होणार

Next

नवी दिल्ली : भारतीय रेल्वेने आखलेल्या ‘नॅशनल रेल प्लॅन (एनआरपी) २०३०’ अंतर्गत रेल्वे तिकिटांची प्रतीक्षा यादी संपविण्यात येणार असून, सर्व तिकिटे निश्चित (कन्फर्म) करण्यात येणार आहेत. ‘एनआरपी २०३०’ ही योजना सार्वजनिक सल्लामसलतीसाठी, तसेच विविध हितधारक आणि मंत्रालयाकडून अभिप्राय मागविण्यासाठी सार्वजनिक करण्यात येणार आहे. 

‘एनआरपी २०३०’मध्ये पायाभूत सुविधांची उभारणी आणि महसूलनिर्मिती यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. या योजनेच्या अंमलबजावणीने रेल्वेच्या मालवाहतुकीत वाढ होईल. महसूलही वाढेल. देशातील एकूण मालवाहतुकीत ४७ टक्के हिस्सेदारी मिळविण्याची रेल्वेची योजना आहे. 

रेल्वे आणखी चार समर्पित मालवाहतूक कॉरिडॉर २०३० पर्यंत उभारणार आहे. नवे मालवाहतूक कॉरिडॉर सरकारी-खाजगी भागीदारीत (पीपीपी) उभारले जातील. त्यामुळे रेल्वेचा मालवाहतूक काळ कमालीचा कमी होईल. परिणामी मालवाहतुकीचे दर कमी करणे रेल्वेला शक्य होईल.

रेल्वेच्या उच्चस्तरीय सूत्रांनी सांगितले की, समर्पित मालवाहतूक कॉरिडॉरमध्ये खाजगी मालवाहतूक गाड्या चालवण्याची रेल्वेची योजना आहे. नव्या धोरणात खाजगी क्षेत्राला आकर्षित करण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण पावले उचलण्यात आली आहेत. २८०० कि.मी. लांबीचे पश्चिम आणि पूर्व समर्पित मालवाहतूक कॉरिडॉर खाजगी गाड्यांसाठी खुले करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. पोलाद, लोह खनिज आणि वाहन या क्षेत्रातील कंपन्यांना आकर्षित करण्याचे रेल्वेचे प्रयत्न सुरू आहेत. 

Web Title: Waiting list for trains to end All tickets are confirmed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.