...यांना प्रतीक्षा पुन्हा वृक्षारोपणाची झाडे गायब, केवळ खड्डे बाकी : मेहरूण चौपाटी परिसरात दुर्लक्षाची परिसिमा
By admin | Published: March 29, 2016 12:25 AM2016-03-29T00:25:48+5:302016-03-29T00:25:48+5:30
जळगाव : दरवर्षी या मेहरूण तलाव परिसरात विविध संघटनांचे हौशी कार्यकर्ते वृक्षारोपण करतात पण त्यांच्या संगोपनाकडे कोणीही लक्ष देत नाही. त्यामुळे तीच जागा, तेच खड्डे आणि वृक्षारोपण करणार्या संघटनांही त्याच अशी प्रचिती येत असते. आताही मेहरूण चौपाटीवरील वृक्षारोपणाचे खड्डे आहे त्याच स्थितीत असून जणू त्यांनाही पुन्हा वृक्षारोपणाची प्रतीक्षा असल्याचेच या परिसरात दिसून येत आहे.
Next
ज गाव : दरवर्षी या मेहरूण तलाव परिसरात विविध संघटनांचे हौशी कार्यकर्ते वृक्षारोपण करतात पण त्यांच्या संगोपनाकडे कोणीही लक्ष देत नाही. त्यामुळे तीच जागा, तेच खड्डे आणि वृक्षारोपण करणार्या संघटनांही त्याच अशी प्रचिती येत असते. आताही मेहरूण चौपाटीवरील वृक्षारोपणाचे खड्डे आहे त्याच स्थितीत असून जणू त्यांनाही पुन्हा वृक्षारोपणाची प्रतीक्षा असल्याचेच या परिसरात दिसून येत आहे. पक्षांचा मोठा अधिवास लाभलेला, चोहोबाजुंनी निसर्गाचा वेढा असलेल्या मेहरूण तलाव परिसरास जैवविविधता वारसा हक्क स्थळ म्हणून दर्जा मिळावा म्हणून एकीकडे प्रयत्न सुरू असताना दुसरीकडे त्याची दुरवस्था दिवसेंदिवस वाढतच असल्याची प्रचिती येत आहे. प्रमुख पर्यटन स्थळशहरातील एक प्रमुख पर्यटन स्थळ म्हणून मेहरूण तलावाची ओळख आहे. विस्तीर्ण परिसर, दाट वनराईमुळे या परिसरात पशुपक्ष्यांचाही मोठ्या प्रमाणात विहार असतो. ब्रिटीश कालीन म्हणजे शंभर वर्षांपेक्षा जास्त कालावधीपूर्वीचा हा तलाव असल्याचे जुन्या जानकार व्यक्तींकडून सांगिलते जाते. १९६९ मध्ये या भागातील वनराईत वाघाचा संचार होता असेही सांगितले जाते. तलावात अंबरझरा, मन्यारखेडा व मोहाडीकडून पाणी येते. मात्र काही बांधकामांमुळे येणार्या प्रवाहात बदल होऊन पाण्याची आवकही गेल्या काही वर्षात घटली आहे. तलावाचे एकूण क्षेत्रफळ ७६ हेक्टर एवढे आहे. तर पाच किलो मीटरची पेरीफेरी आहे. तलावाची साठवण क्षमता ९१.८४ दलघफु एवढी असल्याची नोंद महापालिकेकडे आहे. विकासाकडे दुर्लक्ष मेहरूण तलाव परिसर एक पर्यटन क्षेत्र म्हणून विकसीत व्हावा यासाठी बर्याच वेळेस नियोजन झाले. विविध कामे या परिसरात प्रस्तावित आहेत. मात्र प्रत्यक्षात फारशी कामे या भागात होऊ शकलेली नाहीत. गणेशोत्सव, दुर्गोत्सव काळात तलावात मूर्त्यांचे विसर्जन करताना महापालिका, स्वयंसेवी संस्थांकडून विविध आवाहने केली जात असतात मात्र त्याकडे फारसे कोणी लक्ष देत नाहीत. ------