पक्क्या अतिक्रमणांबाबत अहवालाची प्रतीक्षा मनपा : अतिक्रमणधारकांकडून खुणा पुसण्याचा प्रयत्न
By admin | Published: February 29, 2016 11:32 PM2016-02-29T23:32:03+5:302016-02-29T23:32:03+5:30
जळगाव: मनपाच्या नगररचना विभागाच्या अभियंत्यांमार्फत शहरातील सर्व प्रमुख रस्ते व चौकातील अतिक्रमणांची मोजणी करून त्यावर सीमांकन करण्यात येत असून आता त्याबाबतच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. दरम्यान अतिक्रमणधारकांकडून या खुणा पुसण्याचा प्रयत्न होत असल्याचे समजते. सवार्ेच्च न्यायालयाने नेमलेल्या रस्ता सुरक्षा समितीच्या निर्देशानुसारच मनपा आयुक्तांनी शहरातील प्रमुख रस्त्यांवरील पक्के अतिक्रमण काढण्यासाठी त्याची मोजणी करण्याचे आदेश नगररचना विभागाच्या अभियंत्यांना दिले आहेत. त्यानुसार गेल्या तीन-चार दिवसांपासून या अभियंत्यांनी मोजणी केली. त्याचा अहवाल सोमवारी सायंकाळी सादर करून अंतिम निर्णय होणार होता. मात्र सायंकाळी आयुक्त नसल्याने निर्णय झालेला नसल्याचे समजते. याबाबत निर्णय होताच अतिक्रमण विभागाकडून कारवाई होणार आहे.
Next
ज गाव: मनपाच्या नगररचना विभागाच्या अभियंत्यांमार्फत शहरातील सर्व प्रमुख रस्ते व चौकातील अतिक्रमणांची मोजणी करून त्यावर सीमांकन करण्यात येत असून आता त्याबाबतच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. दरम्यान अतिक्रमणधारकांकडून या खुणा पुसण्याचा प्रयत्न होत असल्याचे समजते. सवार्ेच्च न्यायालयाने नेमलेल्या रस्ता सुरक्षा समितीच्या निर्देशानुसारच मनपा आयुक्तांनी शहरातील प्रमुख रस्त्यांवरील पक्के अतिक्रमण काढण्यासाठी त्याची मोजणी करण्याचे आदेश नगररचना विभागाच्या अभियंत्यांना दिले आहेत. त्यानुसार गेल्या तीन-चार दिवसांपासून या अभियंत्यांनी मोजणी केली. त्याचा अहवाल सोमवारी सायंकाळी सादर करून अंतिम निर्णय होणार होता. मात्र सायंकाळी आयुक्त नसल्याने निर्णय झालेला नसल्याचे समजते. याबाबत निर्णय होताच अतिक्रमण विभागाकडून कारवाई होणार आहे.