इसिसच्या वाटेवरील वाजीद कर्नाटकातून ताब्यात
By admin | Published: December 23, 2015 02:38 AM2015-12-23T02:38:24+5:302015-12-23T08:46:58+5:30
इसिस या दहशतवादी संघटनेत सहभागी व्हायला गेला की काय अशी शंका असलेला मुंबईच्या मालवणी परिसरातील वाजीद शेखला एटीएसने कर्नाटकमधून ताब्यात घेतले
डिप्पी वांकाणी, मुंबई
इस्लामिक स्टेट आॅफ इराक अॅण्ड सीरियामध्ये (इसिस) सहभागी व्हायला गेला की काय अशी शंका असलेला मुंबईच्या मालवणी परिसरातील वाजीद शेख (२५) हा दहशतवादविरोधी पथकाला (एटीएस) कर्नाटकात आढळला. पण याच भागातून दीड महिन्यापासून बेपत्ता असलेला अयाज सुलतान (२३) हा काबूलला गेल्याची माहिती एटीएसच्या हाती आली आहे. हे दोघे आणखी एकासह इसिसमध्ये दाखल होण्यासाठी गेल्याचा संशय होता. वाजीद हा लिंबू विक्रेता असून, तो १५ डिसेंबरपासून बेपत्ता होता. तर अयाज मालवणीतीलच कॉल सेंटरमध्ये कामाला आहे. वाजीद शेखला मुंबईत आणले गेल्यावर आम्ही त्याच्या हालचालींची तपासणी करून त्याला अटक करायची की नाही याचा निर्णय घेऊ, असे एटीएसमधील वरिष्ठ सूत्रांनी ‘लोकमत’ला सांगितले. वाजीद शेखच नव्हे, तर मोहसीन
सय्यददेखील १५ डिसेंबरपासूनच बेपत्ता आहे. या दोघांसोबत साधारण विशीतील व त्याच भागातील आणखी एक जण आहे. परंतु तो बेपत्ता असल्याची तक्रार दाखल झालेली नाही. तो प्रवास करीत असताना मध्येच पकडले असून त्याला मुंबईला आणण्यात येत आहे. त्याला दक्षिण भारतात अडविण्यात आले होते. त्याला अटक करावी की करू नये याचा निर्णय अद्याप झालेला नाही,’’ असे एटीएसच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. हा अधिकारी म्हणाला की, ‘‘वाजीदने त्याचा मोबाईल फोन घरीच ठेवला होता व त्याने दुसऱ्या मोबाईलवरून मुंबईबाहेर राहणाऱ्या त्याच्या नातेवाईकांशी संपर्क साधला होता.’’ मोहसीनने प्रवासासाठी ‘डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यूडॉटआरईडीबीयुएसडॉटईन’वरून तिकीट बुक केले होते. इतर दोघे चकवा देऊ शकले असले तरी आम्ही त्यांच्या मागावर आहोत, असे हा अधिकारी म्हणाला.
वाजीदची पत्नी फातिमाने तो बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांकडे देताना वाजीदमध्ये खूपच बदल झाल्याचे व जिहादसाठी त्याने सहभागी झालेच पाहिजे, असे मला सांगितले होते, असे म्हटले. त्यांनी घर सोडायच्या आदल्या दिवशी वाजीदला मोहसीनने १४-१५ वेळा फोन केला होता. अशाच एका फोनला फातिमाने उत्तर दिले होते. फोनवर आपल्याशी कोण बोलत आहे हे लक्षात न घेता मोहसीनने आपल्याला १५ डिसेंबर रोजी शहर सोडावे लागेल असे म्हणाला होता, असे फातिमाच्या भावाने सांगितले.
मोहसीन व वाजीद यांचे विचार आॅनलाईनवर संपूर्णपणे बदलून टाकण्यात आले आणि या दोघांनी आयसिसशी संबंधित अनेक प्रकारचे साहित्य डाऊनलोड करून घेतले होते, असे एटीएसच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. तो म्हणाला की मालवणी भागातच राहात असलेला व वेगवेगळी कामे करणारा वयाच्या विशीतील तरूण वाजीद व मोहसीनसोबत आहे. आम्ही त्याच्या पालकांकडे त्यांनी तो बेपत्ता झाल्याची तक्रार का नोंदविली नाही अशी विचारणा करू.
दरम्यान, अयाज काबूलला गेला, असे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. ‘‘अयाजने दिल्लीहून थेट काबुलला जाणारे विमान पकडले. त्याच्यासोबत त्याचा स्वत:ता पासपोर्ट होता. आता आम्ही तो तेथून कुठे गेला का याची माहिती घेत आहोत व तो या तिघांच्या संपर्कातही आहे का हे शोधत आहोत, असे त्याने सांगितले.