कोट्यवधींची लाच चारून वॉलमार्ट भारतात

By admin | Published: October 20, 2015 04:22 AM2015-10-20T04:22:10+5:302015-10-20T04:22:10+5:30

वॉलमार्ट या रिटेल व्यवसायातील जगातील अव्वल अमेरिकन कंपनीने दोन वर्षांपूर्वी भारतात शिरकाव करताना स्थानिक पातळीवरील अधिकाऱ्यांना कोट्यवधी रुपयांची (लाखो डॉलर)

Wal-Mart in India with millions of bribe bribe | कोट्यवधींची लाच चारून वॉलमार्ट भारतात

कोट्यवधींची लाच चारून वॉलमार्ट भारतात

Next

वॉशिंग्टन : वॉलमार्ट या रिटेल व्यवसायातील जगातील अव्वल अमेरिकन कंपनीने दोन वर्षांपूर्वी भारतात शिरकाव करताना स्थानिक पातळीवरील अधिकाऱ्यांना कोट्यवधी रुपयांची (लाखो डॉलर) लाच देऊन कामे करवून घेतली अशा बातम्या अमेरिकेत प्रसिद्ध झाल्याने वॉलमार्ट संशयाच्या भोवऱ्यात आली आहे.
अमेरिकेच्या संघीय तपासी संस्थांच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासात वॉलमार्टची ही ‘संशयास्पद लाचखोरी’ उघड झाल्याचे वृत्त ‘वॉल स्ट्रीट जर्नल’ या प्रमुख अमेरिकन वित्तीय दैनिकाने प्रसिद्ध केले आहे. या वृत्तानुसार बंदरे आणि विमानतळांवरून माल कस्टम्समधून सोडवून घेण्यासाठी आणि विविध शहरांमधील विक्री आस्थापनांसाठी घेतलेल्या जागांना परवाने मिळविताना वॉलमार्टने कनिष्ठ पातळीवरील अधिकाऱ्यांना छोट्या छोट्या रकमांची लाच देण्याचे हजारो ‘भ्रष्ट’ व्यवहार केले.
या वृत्तानुसार यापैकी बव्हंशी संशयास्पद देय व्यवहार २०० अमेरिकन डॉलरहून कमी रकमेचे व काही तर अगदी पाच डॉलर एवढ्या क्षुल्लक रकमेचे होते. पण या सर्वांची गोळाबेरीज केली तर लाच म्हणून दिली गेलेली रक्कम लाखो डॉलरच्या घरात जाते, असे संबंधितांकडून सांगण्यात आले. ‘वॉल स्ट्रीट जर्नल’च्या या बातमीवर वॉलमार्टच्या येथील मुख्यालयाकडून लगेच कोणतीही प्रतिक्रिया दिली गेलेली नाही, असे वृत्तसंस्थेच्या वृत्तात म्हटले आहे.
वॉलमार्टच्या मेक्सिकोमधील व्यवहारांमध्ये प्रचंड भ्रष्टाचार झाल्याच्या आरोपांवरून संघीय तपासी संस्थांनी तपास केला तेव्हा कंपनीने भारतात केलेल्या या तुलनेने लहान रकमेच्या; पण मोठ्या प्रमाणावर केल्या गेलेल्या लाचखोरीच्या व्यवहारांची माहिती उघड झाली. मात्र मेक्सिकोच्या बाबतीत कंपनीच्या विरोधात फारसे गंभीर असे काही हाती लागले नाही, असेही या वृत्तात म्हटले आहे. (वृत्तसंस्था)

भारतातील धंदा नफ्यात नाही : कारवाईची शक्यता नाही
अमेरिकन कंपन्यांच्या विदेशातील भ्रष्ट व्यवहारांना चाप लावण्यासाठी ‘फॉरेन करप्ट प्रॅक्टिसेस अ‍ॅक्ट’ हा कायदा आहे; परंतु भारतात केलेल्या या कथित भ्रष्ट व्यवहारांबद्दल वॉलमार्टला या कायद्यानुसार अमेरिकेत दंडित केले जाण्याची शक्यता नाही.
वॉलमार्टला दंड न होण्याचे कारण असे की, या कायद्यानुसार आकारण्यात येणारा दंड संबंधित कंपनीने कथित गैरव्यवहारातून किती लाभ मिळविला याच्याशी निगडित असतो. मात्र वॉलमार्टचा भारतातील एकूणच धंदा नफ्यात नसल्याने कंपनी या कायद्याच्या कचाट्यात येणार नाही, असे जाणकारांचे म्हणणे असल्याचेही ‘वॉल स्ट्रीट जर्नलने नमूद केले आहे.

संपुआच्या काळातील व्यवहार
भारतात मल्टी ब्रॅण्ड रिटेल व्यवसायात विदेशी गुंतवणुकीची दारे खुली होतील या आशेने वॉलमार्टने आधी भारती एंटरप्रायझेसशी संयुक्त व्यवहारांची तयारी केली होती. मात्र २०१३ मध्ये कंपनीने भारताशी संबंध तोडून भारतात एकट्याने घाऊक विक्री व्यवहारात उतरण्याचे ठरविले. मल्टी ब्रॅण्ड रिटेलमध्ये प्रवेश मिळावा यासाठी वॉलमार्टने त्यावेळच्या संपुआ सरकारकडे जोरदार प्रयत्न केले होते.

Web Title: Wal-Mart in India with millions of bribe bribe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.