शहरांच्या प्रमुख मार्गांवर एकाच रंगात रंगणार भिंती, मुख्यमंत्र्यांकडून प्रस्ताव मंजूर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2021 03:14 PM2021-06-20T15:14:50+5:302021-06-20T15:18:06+5:30
सन 1876 साली जयपूरला आलेले वेल्स राजकुमार आणि महाराणी व्हिक्टोरिया यांच्या स्वागतासाठी जयपूरमधील भवन गुलाबी रंगांनी रंगविण्यात आले होते. तीच पंरपरा पुढे काय राहिली अन् जयपूरला गुलाबी नगरी म्हणून ओळख मिळाली.
लखनौ - राजस्थानची राजधानी असलेल्या जयपूरला गुलाबी शहर म्हणून ओळखले जाते. लवकरच उत्तर प्रदेशातील अयोध्या नगरीचीही अशीच वेगळी ओळख अस्तित्वात येणार आहे. उत्तर प्रदेशमधील शहरांच्या प्रमुख रस्त्यांवरील रहिवाशी नसलेल्या आणि व्यवसायिक भवनांना विकास प्राधिकरणाने ठरवून दिलेल्या रंगानेरंगावं लागणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. गृह आणि नगर विकास विभागाकडून लवकरच यासंदर्भातील आदेश जारी करण्यात येणार आहे.
सन 1876 साली जयपूरला आलेले वेल्स राजकुमार आणि महाराणी व्हिक्टोरिया यांच्या स्वागतासाठी जयपूरमधील भवन गुलाबी रंगांनी रंगविण्यात आले होते. तीच पंरपरा पुढे काय राहिली अन् जयपूरला गुलाबी नगरी म्हणून ओळख मिळाली. आता, उत्तर प्रदेशमधील शहरंही अशाच एकाच रंगात उजळून दिसणार आहेत. उत्तर प्रदेशातील नगर विकास मंत्रालयाने शहराच्या मुख्य मार्गावरील भवनांचा बाहेरील भाग सुधारण आणि दुरुस्तीसाठी मॉडेल योजना आखली आहे. या योजनेला मुख्यमंत्र्यांनीही मंजुरी दिली आहे.
नगर विकास सचिवांनी दिपक कुमार यांनी सांगितले की, लवकरच याबाबतचा आदेश जारी करण्यात येणार आहे. विकास प्राधिकरणाद्वारे बोर्डच्या माध्यमातून आपल्या शहरांत ही योजना लागू करावी लागणार आहे. त्यानुसार, शहरातील प्रमुख मार्गांवरील अनिवासी इमारती आणि भवनच्या बाहेर एकच रंग लावण्यात येईल. त्यासाठी मालकांना 6 महिन्यांची मुदत देण्यात येणार आहे. रंगाच खर्चही मालकांनीच करावयाचा आहे. संबंधित शहरातील विकास प्राधिकरणाने प्रमुख मार्ग आणि तेथे वापरण्यात येणाऱ्या रंगाची माहिती संबंधित मालकांना सांगायची आहे. त्यासाठी, स्थानिक मीडियातून जाहीरात द्यावी, असेही सूचविण्यात आले आहे.
नेमप्लेटही एकसारखेच असणार
नेमप्लेट आणि साईन बोर्डही एकाच प्रकारच्या रंगात रंगवून घ्यावे लागणार आहेत. त्यासाठी, नेम प्लेटचा आकार, साईन बोर्ड आणि रंगही प्राधिकरण ठरवून देणार आहे. भवन किंवा दुकानाच्या आकारमानानुसार बोर्डाची लांबी ठरविण्यात येणार आहे.
भगवा रंग लागण्याची शक्यता
कुठल्याही शहरातील प्रमुख मार्गांवरील व्यावसायिक दुकाने किंवा भवन कोणत्या रंगाचे असावे, हे स्थानिक प्राधिकरणाकडून ठरविण्यात येणार आहे. गरजेनुसार एकऐवजी दोन रंगही वापरता येतील. मसलन, प्रभू श्रीराम यांची नगरी असल्याने अयोध्येतील प्रमुख मार्गांवर भगवा रंग दिसून येण्याची शक्यता आहे. तर, ताजनगरी असलेल्या आग्र्यामध्ये ताजमहाप्रमाणे पांढऱ्या रंगांनी सजलेले प्रमुख महामार्ग दिसून येतील.