वॉलमार्टने भारतीय सरकारी बाबूंना दिली करोडोंची लाच

By admin | Published: October 19, 2015 02:08 PM2015-10-19T14:08:08+5:302015-10-19T14:08:08+5:30

अमेरिकेतल्या वॉलमार्ट या जायंट कंपनीने भारतामध्ये लाखो डॉलर्स किंवा कोट्यवधी रुपयांची लाच दिल्याचा संशय असल्याचे वृत्त वॉल स्ट्रीय जर्नलने दिले आहे

Walmart bribe Indian government officials for bribe | वॉलमार्टने भारतीय सरकारी बाबूंना दिली करोडोंची लाच

वॉलमार्टने भारतीय सरकारी बाबूंना दिली करोडोंची लाच

Next
>ऑनलाइन लोकमत
वॉशिंग्टन, दि. १९ - अमेरिकेतल्या वॉलमार्ट या जायंट कंपनीने भारतामध्ये लाखो डॉलर्स किंवा कोट्यवधी रुपयांची लाच दिल्याचा संशय असल्याचे वृत्त वॉल स्ट्रीय जर्नलने दिले आहे. खालच्या पातलीवरील सरकारी बाबूंना चिरीमिरी दिल्याच्या हजारो घटना घडल्याचा आरोप असून कस्टममधून माल सोडवणे किंवा रियल इस्टेटमधल्या मंजुरी मिळवणे आदी स्वरुपाच्या कामासाठी वॉलमार्टने लाच दिल्याचा संशय आहे. 
एकेका अधिका-याला लाच दिल्याची रक्कम कमी म्हणजे २०० डॉलर्सच्या किंवा १० ते १२ हजार रुपयांच्या आसपास आहे. काही घटनांमध्ये तर ५ डॉलर्स किंवा २५० ते ३०० रुपयांची लाच देण्यात आली आहे. परंतु अशा सगळ्या लाचखोरीच्या घटना एकत्र केल्या आणि लाच दिलेली रक्कम काढली तर काही दशलक्ष डॉलर्स असल्याचा अंदाज आहे. दोन वर्षांपूर्वी वॉलमार्टने भारती एंटरप्रायझेसबरोबरचा संयुक्त करार रद्द केला आणि स्वत: घाऊक विक्रीत उतरण्याचा निर्णय घेतला. 
बहुउद्देशीय मालाच्या किरकोळ विक्रीसाठी किंवा मल्टिब्रँड रिटेल क्षेत्रात विदेशी कंपन्यांना मंजुरी द्यावी यासाठी काँग्रेसच्या काळात वॉलमार्टने आग्रह धरला होता, त्याचबरोबर अमेरिकेतील राजकीय वर्तुळातही दबावगट करण्याचा प्रयत्न केला होता असेही या वृत्तात नमूद करण्यात आले आहे. 
अर्थात, अमेरिकेतल्या कायद्यातल्या तरतुदींनुसार लाच दिल्यास दंडाची तरतूद तेव्हाच लागू होते जेव्हा कंपनीने भरपूर नफा कमावलेला असतो, परंतु वॉलमार्टने भारतात भरपूर नफा कमावल्याचे चित्र अद्याप तरी नाही. वॉलमार्टने या वृत्तावर लगेचच कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नसल्याचेही वॉल स्ट्रीट जर्नलने म्हटले आहे. तपास पथकांना वॉलमार्टच्या मेक्सिकोमधील कारभाराची चौकशी करताना वॉलमार्टने भारतात लाचखोरी केल्याचे आढळले आणि हा सगळा प्रकार उघड झाला.

Web Title: Walmart bribe Indian government officials for bribe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.