भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू
By admin | Published: June 8, 2017 08:39 AM2017-06-08T08:39:02+5:302017-06-08T08:39:02+5:30
उत्तर प्रदेशमधील सहारनपुर जिल्ह्यात असलेल्या थाना गंगोहमध्ये भटक्या कुत्र्यांनी एका सफाई कामगार महिलेवर हल्ला केल्याची घटना घडली आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
सहारनपुर, दि. 8- उत्तर प्रदेशमधील सहारनपुर जिल्ह्यात असलेल्या थाना गंगोहमध्ये भटक्या कुत्र्यांनी एका सफाई कामगार महिलेवर हल्ला केल्याची घटना घडली आहे. या कुत्र्यांचा भीषण हल्ल्यात त्या महिलाचा मृत्यू झाला आहे. हल्यात मृत्यू झालेल्या महिलेचं शव पोस्टमार्टमसाठी पाठविण्यात आलं आहे.
सफाई कर्मचारी असलेली ही महिला गंगोहमध्ये असणाऱ्या लखनौती गावाची रहिवासी होती. 55 वर्षीय बालादेवी मंगळवारी कचरा फेकायला गावाच्या बाहेर गेल्या होत्या त्यावेळी त्यांच्यावर भटक्या कुत्र्यांच्या टोळीने हल्ला केला होता. सहारनपुरचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक बबलू कुमार यांनी ही माहिती दिली आहे.
मंगळवारी दुपारच्या सुमारास रस्त्यावर कुणीही नव्हतं.पोलिसांच्या माहितीनुसार भटक्या कुत्र्यांच्या टोळीने महिला रक्तबंबाळ होइपर्यत तिच्यावर हल्ला केला होता. काहीवेळानंतर तेथील स्थानिकांनी हा प्रकार बघितल्यावर पोलिसांना माहिती दिली.
स्थानिकांच्या माहितीनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि महिलेला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. पण तेव्हा डॉक्टरांनी महिलेला मृत घोषित केलं.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तेथील भटक्या कुत्र्यांपासून लोकांचा बचाव करण्यासाठी संपूर्ण भागात विशेष उपाययोजना करण्यासाठी नगरपालिकेला आदेश देण्यात आले आहेत.