सीए व्हायचंय? १०० मार्कांचा जीएसटीचा पेपर तर द्या!

By admin | Published: July 1, 2017 06:02 PM2017-07-01T18:02:35+5:302017-07-01T18:02:35+5:30

पुढच्या वर्षीपासून सीए परीक्षेत द्यावा लागणारा जीएसटीचा पेपर, पंतप्रधान मोदींची घोषणा

Want to become CA? Give 100 marks of GST paper! | सीए व्हायचंय? १०० मार्कांचा जीएसटीचा पेपर तर द्या!

सीए व्हायचंय? १०० मार्कांचा जीएसटीचा पेपर तर द्या!

Next

- अनन्या भारद्वाज


आज सीए अर्थात चार्टर्ड अकाऊण्टण्ट दिन आहे. चार्टर्ड अकाऊण्टण्ट होणं काही सोपं नाही. अत्यंत अवघड अशी ही परीक्षा आणि त्याहुन कठीण आर्टिकलशिपचा काळ. आॅडिटला जावून जावूनच अनेक सीए होऊ पाहणारे दमून जातात. आता त्यांची अजून परीक्षा पाहणारे खडतर दिवस पुढेच आहेत. पुढच्या वर्षीपासून जीएसटीचा १०० मार्कांचा पेपर सीए परीक्षेत द्यावा लागणार आहे. येत्या नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या परीक्षेतही १० मार्क जीएसटीविषयावर आधारित प्रश्नांना असतील असं काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच जाहीर केलं आहे.
जीएसटीचा आर्थिक सामाजिक परिणाम होणार असताना पुढच्या काळात सीए होणाऱ्यांना त्याचा परीपूर्ण अभ्यास करणं गरजेचं आहे असं वाटल्यानं हा बदल करण्यात येत आहे. इन्स्टिट्यूट आॅफ चार्टर्ड अकाऊण्टण्ट आॅफ इंडियानंही या बदलाला पाठिंबा दर्शवला आहे. एवढंच नव्हे तर सीपीटी, आयपीसीसी आणि फायनल अशा तिन्ही परीक्षेत बदल करण्याचे सुतोवाच ही या संस्थेनं केलं आहे.
त्यामुळे येत्या काळात सीएची परीक्षा अधिक कठीण होणार हे उघड आहे.

Web Title: Want to become CA? Give 100 marks of GST paper!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.